मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024-
![]() |
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना |
महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील साठ वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. आता ज्येष्ठांना देशातील महत्त्वाचे तीर्थस्थळांची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविलली जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय 14 जुलै 2024 रोजी सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील एकूण 73 व महाराष्ट्रातील 66 अशी एकूण 149 तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या योजनेमध्ये देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थस्थळांचा समावेश राज्य सरकारने केला आहे, जेणेकरून जेष्ठ नागरिकांना तीर्थस्थळावर जाऊन दर्शन घेता येईल, तेही मोफत. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिकांना देशभरातील महत्त्वाच्या तीर्थस्थानचे दर्शन घेता यावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील महत्त्वाचे तीर्थस्थळाचे दर्शन घेता येईल, तीर्थयात्रांना जाऊन मनशांती, अध्यात्मिक पातळी गाठणे, सुखकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे मोफत दर्शन या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 मध्ये देशातील व राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून निश्चित केलेल्या तीर्थक्षेत्र पैकी एका यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. याबरोबरच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति-व्यक्ती 30 हजार रुपये इतकी ठरवण्यात आले आहे.
यामध्ये भोजन, प्रवास, निवास, इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दोन लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असावे, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, व त्याचे वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन मिळण्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या योजनेच्या माध्यमातून रेल्वे तथा बस प्रवासाची नियोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या आणि रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समक्ष अधीकृत असलेला अधिकृत कंपनीची निवड करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाईल. याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या आधारावर कोटा निश्चित करण्यात येईल. तसेच प्राप्त झालेल्या अर्जाच्या उपलब्धतेनुसार लॉटरी द्वारे प्रवाशांची निवड केली जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी 75 वर्षावरील असल्यास त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला या योजनेच्या माध्यमातून त्याच्या सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या योजनेच्या राज्यस्तरावरील सनियंत्रण वाढवा घेण्यासाठी राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली 17 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांचे समिती कार्यरत असेल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सदस्य सचिव असतील तर राज्य स्तरावर आयुक्त समाज कल्याण हे नोडल अधिकारी म्हणून काम करतील.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 च्या माध्यमातून देशातील हिंदू धर्मात चार धाम यात्रा, माता वैष्णवी यात्रा, अमरनाथ यात्रा, इतर धर्मियांची ही मोठी तीर्थस्थळ आहे. तिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते.
पुण्य कर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा असते मात्र आर्थिक दृष्ट्या गरिबी असल्यामुळे अनेक कुटुंबातील नागरिकांना तीर्थस्थळे जाण्यास अडचणींना सामना करावा लागतो किंवा कोणी सोबत नसल्यामुळे किंवा पुरेशी माहिती नसल्यामुळे जेष्ठ नागरिकांचे तीर्थ दर्शन करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व धर्मीयांमधील जेष्ठ नागरिक ज्यांचे वय हे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना देशभरातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 सुरू करण्यास मान्यता देण्यात आले आहे.
- योजनेचे नाव- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
- कोणी सुरू केली- महाराष्ट्र सरकार
- कधी सुरू झाली- जुलै 2024
- लाभार्थी- राज्यातील 60 वर्षावरील नागरिक
- उद्दिष्ट- तीर्थस्थळांचे दर्शन
- लाभ- देशभरातील महत्त्वाच्या तीर्थस्थळांचे मोफत दर्शन
- अर्ज प्रक्रिया- ऑनलाईन
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची वैशिष्ट्ये :-
- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थ दर्शन करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
- ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन घेण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
- या योजनेचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने ठेवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या तरतुदी:-
- 75 वर्षांवरील लाभार्थ्याला त्यांच्या सहाय्यापैकी एकाला सोबत घेण्याची परवानगी असेल परंतु हे अर्जदारांना अर्ज नमूद करावे लागेल.
- 75 वर्षांवरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तरी सहाय्यक प्रवासी अर्जदारासोबत प्रवास करण्यास पात्र असेल.
- प्रवासात साहेब प्रवासी घेण्याची सोय नाही तेव्हा उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय 75 वर्षे पक्षा जास्त असेल आणि त्याने त्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल.
- जर दोन्ही पती-पत्नीचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांच्यासोबत एक सहायक घेता येईल.
- सहाय्यक प्रवासी चे वय 21 वर्षे ते पन्नास वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- प्रवासी पती-पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवाशाचे संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची पात्रता :-
- अर्जदार लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्ज दाराचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अपात्रता :-
- जो लाभार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी नाही असा नागरिक या योजनेचा अर्ज करण्यासाठी अपात्र आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य महिला आयकर दात्या आहे असा नागरिक योजनेचा अर्ज भरण्यास अपात्र आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्या नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करत आहे.
- नागरिक सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य माजी आमदार/ खासदार विद्यमान आहे अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या प्रवासासाठी लाभार्थी हे शारीरिक दृष्टया आणि मानसिक दृष्टया सक्षम असणे आवश्यक आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्ग जन्य रोग नसावा जसे की TB, हृद्यासंबंधी रोग, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी.
- अर्जदाराला अर्जासोबत सरकारी वैदकीय अधिकाऱ्याने आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिक दृष्टया सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवस आधीचे असावे.
- ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे अशा व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत.
- जे अर्जदार मागील वर्षामध्ये प्रवासासाठी निवडले गेले होते परंतु त्यांचा प्रवास झाला नाही असे अर्जदार देखील अपात्र ठरेल.
- अर्जात विचारलेली माहिती चुकीची आढळल्यास देखिल अर्जदार अपात्र ठरतील.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे:-
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- ऑनलाइन अर्ज
- जन्म प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वैदकिय प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जवळच्या नातेवाईकांचा मोबाइल नंबर
- हमीपत्र
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची अर्ज प्रक्रिया:-
या योजनेचा अर्ज ऑलाईन पद्धतीने करावा लागेल.
या योजनेचा अर्ज पोर्टल/ मोबाइल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्र द्वारे ऑनलाइन पद्धतीने करता येईल.
ज्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही, त्यांनी शेतू सुविधा केंद्र येथे जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
मूळ जाहिरात येथे पहा:-
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा