आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये मुख्यमंत्री वयोश्री योजना..!!

आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3000 रुपये मुख्यमंत्री  वयोश्री योजना..!!



वयोश्री योजना: 

माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच राज्यातील जनतेच्या विकासासाठी नवनवीन योजना संकल्पना राबवत असतात यामधील एक संकल्पना अर्थातच योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे. या योजनेवर आज आपण या ठिकाणी सविस्तर अशी विस्तृत माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे प्रत्येकाच्या घरांमध्ये वयस्कर वडीलधारी व्यक्ती असतात. त्यात जे वृद्ध व वयस्कर व्यक्ती असतील त्यावेळी श्री योजना साठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात किंवा या योजनेचा लाभ त्यांना कसा मिळू शकतो या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी महत्त्वाचे निकष काय व कोणते आहेत यासाठी कागदपत्रे कोण तिला लागतात हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना का व कशासाठी? 

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 65 वर्ष व त्या अधिक वयाची लोकसंख्या 10 ते 12% इतकी आहे तर या लोकांना राज्य सरकार द्वारे त्यांचे एका ठराविक वयाच्या नंतर म्हणजे 65 वर्षाच्या नंतर आर्थिक मदत केली जाणार आहे, यावेळी योजना अंतर्गत त्या वयाविरुद्ध जेष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात व त्यास म्हणते जास्त वयामुळे भरपूर विचाराने त्रस्त असतात त्यांना त्या वयामध्ये भरपूर शारीरिक व्याधी उद्भवलेल्या असतात.

 तर त्यांचे आरोग्य हे उत्तम प्रकारचे रहावे त्यांना एक आर्थिक पाठबळ मिळावे एक आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत या सर्व 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त सर्व शाळा जेष्ठ नागरिकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे. तरीही योजना वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना सशक्त करण्यासाठी व त्यांच्या फायद्यासाठी राबविली गेली आहे. तरी या योजनेचा फायदा हे 65 वर्ष व त्याहून अधिक वयाच्या दृष्टी नागरिकांना मिळणार आहे. 

या संबंधीनुसार महाराष्ट्र शासनाने जीआर काढला असून त्यामध्ये त्यांनी या योजनेबद्दल ची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की जे आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये 65 वर्षापेक्षा जास्त असणारे जेष्ठ नागरिक आहेत त्यांना त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही आवश्यक अशी उपकरणे लागत असतील म्हणजेच चष्मा, वकर, विल चेयर आणि काही गोष्टी लागत असतील तर त्यांना उपलब्ध करून देण्यात येतील त्यासाठी मुख्यमंत्री योजना सुरू करण्यात आली आहे.

तसेच यामध्ये मानसिक आरोग्य उपचार केंद्र तसेच कुटुंब कल्याणासाठी लागणारा इतर उपाययोजनांचा समावेशाही योजनांमध्ये केलेला आहे, या मुख्यमंत्री वय श्री योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने व वर्ष 65 व त्यापेक्षा जास्त वेळच्या दिस नागरिकांना लागणारी साधनसामग्री तसेच उपचारांसाठी लागणारे आवश्यकते जर कोणी एखादा वयोवृद्ध अपंग असेल तर त्यासाठी लागणारे साहित्य हे सर्व त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. ज्याच्या अनुषंगाने ते त्यांचे जीवन हे व्यवस्थित रित्या जगू शकतील. त्यांना कोणत्याही प्रकारच्या शारीरिक त्रास होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचण अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. त्यांना जीवन जगण्यासाठी तत्व तत्परतेने मदत या योजना अंतर्गत केली जाणार आहे. 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये पात्रतेचे निकष व नियम:-

या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणकोणते निकष असतील याबद्दल आपण पाहूयात,

 जर जे कोणी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असतील ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी व नागरिक असावे, व त्यांना डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असावी या नागरिकांचे वय स्पासत वर्ष व त्यावरून जास्त आहे त्यांच्याकडे तुमचे आधार कार्ड असायला हवे जर त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल व दुसरे कोणते त्यांच्या ओळखीच्या पुरावेच्या कागदपत्रे असतील तरी ती या ठिकाणी स्वीकारली जातील.

 त्याचबरोबर जे नागरिक या योजनेसाठी अर्ज करणार आहेत किंवा या योजनेसाठी त्यांना पात्र व्हायचा आहे अशा नागरिकांकडे जिल्हा प्राधिकराकडून त्यांची पात्रता सिद्ध करू शकता किंवा त्यांचे रेशन कार्ड व इतर योजना बद्दलचे निवृत्तीवेतन असल्याचा किंवा मिळण्याचा पुरावा देऊ शकतात.

 यामध्ये या योजनेसाठी म्हणजेच वयोश्री योजना चा लाभ घेणाऱ्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे रुपये दोन लाख च्या आत मध्ये असावे त्याबद्दल सविस्तर उत्पन्नाचा दाखला व स्वतःचे वचन पत्र सादर करणे आवश्यक आहे. 

जे नागरिक या योजनेसाठी पात्र होतील, त्यांनी त्यांच्या व्यक्तिक आधार कार्ड आणि त्यांच्या बँकेच्या सेविंग अकाउंट ला जोडलेले असावे कारण त्यामध्ये योजनेचे  तीन हजार रुपये डीबीटी प्रणालीद्वारे डायरेक्ट वितरित केल्यानंतर ज्या ज्येष्ठ नागरिकांनी येणाऱ्या तीस दिवसांच्या आत मध्ये ज्या कोणत्या मानसिक आरोग्य केंद्रातून  जी कोणती उपकरणे खरेदी केले आहेत आणि त्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे जमा करणे आवश्यक आहे., तसेच हे सर्व दस्ताऐवज समाज कल्याण साहित्य आणि त्यांनी प्रमाणित केलेले असायला हवेत ज्येष्ठ नागरिकांनी सर्व कागदपत्रे पुढील 30 दिवसांच्या आत मध्ये संस्थेच्या वेबसाईट वरती अपलोड करणे अनिवार्य आणि अन्यथा त्यांच्या बँक अकाउंट मधून पैसे वजा केले जातील. 

जो काही ज्येष्ठ नागरिकांना कांचा जिल्हा असेल त्या जिल्ह्यातील 30 टक्के लाभार्थी महिला असतील. 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करताना लागणारे कागदपत्रे:-

या योजनेमध्ये जे नागरिक अर्ज कराव इच्छित आहेत अशा नागरिकांना कोणकोणते आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत याची यादी आपण खालील प्रमाणे दिली आहे ती सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे. 

  1. आधार कार्ड 
  2. मतदान कार्ड 
  3. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक 
  4. पासवर्ड साईज चे दोन फोटो 
  5. स्वयंघोषणापत्र 
  6. ओळख पटवण्यासाठी असणारे अन्य कागदपत्रे 

वयोश्री योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करायचा?

या योजनेबद्दलचा जीआर हा महाराष्ट्र शासनाने नुकताच प्रकाशित केला असून या योजनेविषयी स्वतंत्र एक अधिकृत वेबसाईट महाराष्ट्र शासनाकडून तयार करण्यात येणार आहे. ज्यावेळेस ती वेबसाईट लाईव्ह होईल व या योजना संदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू होईल तेव्हा आम्ही त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून देणार आहोत. 

या योजना शिबिरासाठी जे कोणी अधिकारी नियुक्त केले गेले असतील ते जे कोणी पात्र झालेले जेष्ठ नागरिक असतील त्यांच्या सर्व कागदपत्रांची व्यवस्थितरित्या पडताळणी करून ठेवतील तसेच सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांनाही टोकन दिले जाणार जे कोणी ऑनलाईन अर्ज भरतील त्यांना हेही इथे कोण देण्यात येईल व जे कोणी आपले अर्ज भरतील त्यांना फक्त नोंदणी पावती दिली जाईल. 

प्रशासकीय पातळीवरती या सर्व कामांचे मूल्यांकनांचे काम पूर्ण झाल्यानंतर पात्र नागरिकांची माहिती ऑनलाईन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने पुणे येथील समाज कल्याण आयुक्त आणि मुंबईतील सामाजिक न्याय आणि विशेष विभागाकडे स्फुर्त करण्यात येईल यामध्ये पात्र असणाऱ्या किंवा झालेला ज्येष्ठ नागरिकांच्या यादीमध्ये त्यांचे डिटेल्स जसे की फोटो, नाव, खाते नंबर, आधार नंबर, बीपीएल कार्ड नंबर, या सर्व गोष्टींचा समावेश असेल व ती सर्व माहिती त्या आयुक्तालच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसारित करण्यात येईल. 

पुढील काळामध्ये या योजनेबद्दलचे येणारे सर्व अपडेट्स वेळोवेळी आपल्याला देण्यात येईल आपल्या घरामध्ये किंवा आजू बाजूच्या सर्व ६५ वर्षे व त्याहून अधिक असणारे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेबद्दल माहिती द्यावी व त्यांना नि योजनेचा लाभ मिळवून द्यावा. 

निष्कर्ष:- 

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वय श्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ज्या नागरिकांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये हे राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. यामध्ये त्यांना त्यांच्या वृद्धावस्थेमध्ये उद्भवणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य संबंधित औषधे व इतर सामग्री घेण्यासाठी त्यांना या सामाजिक मुख्यमंत्री व श्री योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. नागरिक हे वयाच्या 65 वर्षे ओलाडल्यानंतर त्यांच्याकडे ठराविक असा उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध नसतो त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात जगताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे राज्य सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत पुरविली जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या

लाडकी बहीण नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार