व्यवसायासाठी महिलांना मिळते बिनव्याजी कर्ज जाणून घ्या- उमेद योजनेविषयी कसा करणार अर्ज, कोणाला मिळतो लाभ, किती मिळेल रक्कम
व्यवसायासाठी महिलांना मिळते बिनव्याजी कर्ज: जाणून घ्या- 'उमेद' योजनेविषयी, अर्ज कसा करणार, कोणाला मिळतो लाभ, किती मिळेल रक्कम-
राज्यातील ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात 2011 मध्ये केली. महाराष्ट्र राज्यात सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभागा-अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभ्यास उमेद या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 34 जिल्हे व 351 तालुक्यात पूर्ण ताकदीने अभियान राबविले जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा व्यक्तीक गरजांसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते. चला तर जाणून घेऊया 'उमेद' योजनेविषयी.
अभियानाची उद्दिष्टे-
महाराष्ट्र राज्यातील ७१ लाख गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी अभियान कटीबद्ध आहे. या माध्यमातून स्वयंसहायता गट, बचत गट याद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील चालना दिली जात आहे.
काय आहे उमेद अभियान ?
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद हा सरकारकडून राबविला जात असलेला एक नवीन महत्त्वाचा उपक्रम तसेच अभियान आहे. ग्रामीण भागात राहत असलेले स्त्रिया काही विशिष्ट हेतू उद्दिष्ट साध्य करण्याकरिता सर्व मिळून विविध महिला गटाद्वारे एकत्र येत असतात, अशा महिलांना ह्या उपक्रमातून सरकारकडून पाठबळ दिले जाते. एखाद्या विशिष्ट बचत गटाला जेवढे आवश्यकता आहे, तेवढे कर्ज बँकेकडून दिले जावे खास करून यात करण्यात आली आहे.
उमेद च्या माध्यमातून महिलांना बचत करण्याची सवय लागली असून त्यांच्यात स्वयंरोजगारांसह बँकेचे व्यवहार करण्याची क्षमता विकसित झाली आहे. अनेक महिला बँकेमार्फत कर्ज घेऊन काम करत आहेत. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान करण्यात आले आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या नावाने हे अभियान राबविले जात असतांना त्याचे उमेद असे नामकरण करण्यात आले. उमेद या शब्दात च योजनेचा सगळा सार समावला आहे. उमेद ही कार्यकर्तुत्वाला चालला देणारी मनाला उभारी देणारी गोष्ट.
उमेद अभियान का राबवले जात आहे-
ग्रामीण भागात राहत असलेल्या गरजू महिलांना देखील स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करता यावा. स्वतःचा उद्योग सुरू करून पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करता यावी, महिलांची उपजीविकेचे स्त्रोत अधिक बळकट व्हावे. त्यांची गरिबी दूर व्हावी. यासाठी सरकार अभियान राबवत आहे. सर्व बँकांकडून महिलांना बचत गटांना कुठलेही तारण न घेता कमी व्याजदरात कर्ज प्रदान करण्यात यावे याबाबत राज्य शासन कठीण कटीबद्ध आहे.
उमेद अंतर्गत महिलांना किती कर्ज मिळते-
उमेद अभियानांतर्गत सरकार ग्रामीण भागातील तसेच तळागाळातील गरजवंत महिलांना वीस लाखापर्यंतचे कर्ज प्रदान करणार आहे. उमेदवार सरकार महिलांना जे कर्ज उपलब्ध करून देते त्यावर नाममात्र व्याजदर आकारले जाते. तर बचत गटाचे प्रमाणे बँका त्यांना कर्ज देतात.
महिलांना तारण ठेवावे लागेल का ?
उमेद अभियान अंतर्गत सरकार महिलांना जे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्या कर्जासाठी महिलांना कुठल्याही प्रकारची वस्तू, संपत्ती, घराची, जमिनीची कागदपत्रे, मौल्यवान दागिने, इत्यादी काहीही तारण ठेवावे लागणार नाही.
कर्जाच्या रक्कम एक महिला काय करू शकतात-
उमेद अभियानांतर्गत जे कर्ज महिलांना दिले जाईल त्या कर्जाच्या रक्कम महिला स्वतःचा एखादा स्टार्टअप म्हणजे छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतील.
कोणते अटी नियम लागू आहेत-
उमेद अभियान अंतर्गत प्राप्त होत असलेल्या कमी व्याजदरातील कर्जाचा लाभ फक्त महिला बचत गट मधील सदस्य महिलाच घेऊ शकतात. एवढेच नव्हे तर ही कर्जाची रक्कम महिला आपल्या वैयक्तिक कर्जासाठी देखील वापरू शकतात.
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि केंद्र सरकारने ठरवलेला धोरणाप्रमाणे या योजनेचा लाभ त्याच बचत गटाला घेता येईल याची जिल्ह्यातील ग्रामीण विकास यंत्रणेकडे नोंद असणार आहेत.
कोणत्या महिला गटाला 0 व्याज दराने कर्ज दिले जाते-
ज्या महिला बचत गटाकडून आपल्या घेतलेल्या कर्जाची वेळेवर आणि नियमितपणे परतफेड करण्यात येते. अशा महिला बचत गटाला सुमतीबाई सुकळीकर महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत व्याजावर अनुदान प्रदान करण्यात येते. अशा बचत गटांना शून्य टक्के व्याजदर असे आकारणी करून कर्ज देखील दिले जाते.
कोणती कागदपत्र लागतात-
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक बँकेची इतर माहिती
- ज्या व्यवसायासाठी कर्ज घेत आहे त्या व्यवसाय विषयक आवश्यक कागदपत्रे.
अभियानाची ऑनलाइन माहिती व अर्ज कसा करणार-
- उमेद या अभियानाची अधिकृत वेबसाईट www.Umed.in
- वेबसाईटवर गेल्यावर मुखपृष्ठावर बचत गट कर्ज प्रस्ताव यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला बँक लोन प्रपोजल असे इंग्रजीत लिहिलेले दिसेल.
- ज्या ठिकाणी तुम्ही SHG प्राथमिक तपशील भरा, जसे की नाव, गटाचे प्रमुखाचे नाव भरा, बचत गटाची सत्यापित करा, एमसीपी निवडा, बँक तपशील निवडा, बँक कर्ज बद्दल माहिती भरा.
या योजनेअंतर्गत लाभार्थी संख्येवर एक नजर-
स्वयंसहायता गटाची स्थापना- 58 93 50
गटामध्ये समावेश केलेल्या कुटुंबाची संख्या- 59 15 490
ग्राम संघाची स्थापना- 30 391
प्रभाग संघाची स्थापना- 17 67
उत्पादक गट संख्या- 13851
शेतकरी महिला उत्पादक कंपनी- 73
उमेद मार्ट वेबसाईट वर करू शकता नोंदणी, महिलांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी शासनाकडून योजना राबविली जाते. कर्ज दिले जाते. त्याचबरोबर महिलांनी उत्पादित केलेल्या साहित्यांचे मार्केटिंग देखील शासनाचे वेबसाईट द्वारे केली जाते. त्यासाठी उमेदवार नावाचा अधिकृत वेबसाईट पर्याय दिला आहे. त्यामुळे जिल्हा न्याय यात समावेश असतो.
( स्त्रोत: महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट उमेदवारी घेतलेली माहिती )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा