खुशखबर, लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले, आता पुढे काय? मुख्यमंत्र्यांनी दिली आणखी एक गुड न्यूज
खुशखबर, लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले, आता पुढे काय? मुख्यमंत्र्यांनी दिली आणखी एक गुड न्यूज-
बदलापूर: लाडकी बहीण योजनेसाठी आता सप्टेंबर महिन्या पर्यंत अर्ज करता येणार आहेत. ज्या महिलांचे या योजनेसाठी अर्ज भरायचे राहिले आहे किंवा ज्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या असतील त्यांच्यासाठी ही मुदत वाढविण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली.
लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर, तुमच्या सावत्र भावाने या योजना वरती टीका केली. या योजना पूर्ण होणार नाहीत, अशा नकारात्मक गोष्टी पसरवल्या; मात्र आता या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर विरोधकांना चांगला फुटला आहे. त्यामुळे हे विरोध करणारे तुमच्यासमोर आले तर त्यांना जोडे दाखवा, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे आणि विरोधकांना चांगले खडसावले. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
लाडकी बहीण योजनेची मुदत आणि सप्टेंबर पर्यंत वाढवली असून, येत्या 17 तारखेपर्यंत योजनेचे दोन महिन्याचे एकत्रित हप्ते असे एकूण 3000 हजार रुपये या महिलांच्या खात्यांत जमा होतील, असे जाहीर करण्यात आले होते; मात्र त्या आधीच जवळपास 33 लाख महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे 17 तारखेपर्यंत उर्वरित लाभार्थी महिलांच्या खात्यात देखील रक्कम जमा होणार आहे. हे सरकार जे बोलते ते करते. कोट्यवधीमध्ये लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयांची किंमत नाही; मात्र आमचे कुटुंब चालवताना माझ्या आईला जे कष्ट करावे लागले ते कष्ट मी पाहिले आहेत. त्यामुळे या दीड हजाराची किंमत मी जाणतो, असा टोला मुख्यमंत्री यांनी विरोधकांना लगावला.
याप्रसंगी पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, आमदार किसन कथोरे, आमदार डॉक्टर बालाजी पुणेकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे तसेच बदलापूर व अंबरनाथ शहरातील माजी लोकप्रतिनिधी व शिवसेनेच्या महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
लाडक्या बहिणीशी संवाद-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृश्यप्रणाली द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील मानपाडा येथील सुनीता गाडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले. जिल्हा प्रशासनाने यासाठी मदत केली असे त्या म्हणाल्या.
पुणे- महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेतून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून, या योजनेचा उद्या (ता. 17) पुण्यात शुभारंभ होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. महिलांना केवळ 1500 रुपये दिले जाणार आहेत, अशी टीका करून विरोधकांनी योजनेकडे व्यापारी पद्धतीने बघून नये, भाऊबिजेची किंमत करायची नसते, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी केली.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे दुपारी साडेबारा वाजता हा कार्यक्रम होणार असून, पुणे जिल्ह्यातील महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत, तर अन्य जिल्ह्यातील महिला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती डॉ. नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेच्या सुदर्शना त्रिगुनाईत, सारिका पवार, किरण साळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप देशमुख, भाजपचे संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.
नीलम गोरे म्हणाल्या, ज्या योजनेची अंमलबजावणी होत असताना विरोधकांकडून त्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महायुती सरकारने केवळ लाडकी बहीण योजना सुरू केली नाही, तर महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेतून वर्षातून तिन सिलेंडर मोफत, महिलांना रोजगार देण्यासाठी ई-रिक्षा खरेदीसाठी अर्थसाहाय्य, बचत गटातील महिलांना भांडवल देणे, विद्यार्थिनींचे उच्च शिक्षण मोफत करणे अशा योजना राबविल्या आहेत. विरोधक यापूर्वी सत्तेत होते, त्यांना अशा योजना राबविण्याची संधी होती, पण त्यांनी निर्णय घेतले नाहीत याची त्यांना रुखरुख असेल असा टोलाही गोरे यांनी लावला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा