"लाडकी बहीण' नंतर आता अन्नपूर्णा योजना, तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत! कसा करायला अर्ज?"
"लाडकी बहीण' नंतर आता अन्नपूर्णा योजना, तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत! कसा करायला अर्ज?"
![]() |
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना:
राज्य सरकारने महिलांना आणखी एक खुशखबर देत मुख्यमंत्री लाडके बहीण आणि विद्या वेतन योजने नंतर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली आहे. राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील 52 लाख 16 हजार लाभार्थी महिलांना मिळणार आहे. त्याचबरोबर लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना चा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे या योजनेतून केंद्र सरकारचे प्रधानमंत्री उज्वला योजनेतील 52 लाख 16000 हजार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल.
ठळक मुद्दे :-
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे काय ?
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश ?
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची पात्रता-
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची वैशिष्ट्ये ?
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
काय आहे अन्नपूर्णा योजनेच्या अटी ?
- महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या महिलांना ज्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असेल.
- एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाही.
- 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडर ची जोडणी असलेल्या गॅस धारकांना याचा लाभ मिळेल.
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र असतील.
- प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनांतर्गत पात्र असलेल्या 52.16 लाख महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनांतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलिंडर चे पुनर्भरण करून मिळणारं आहे.
- केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडके बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
अन्नपूर्णा योजनेची वैशिष्ट्ये-
या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन वापस सिलेंडरचे पैसे दिले जाणार असून, प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केले जाणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही या योजनेत समावेश करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सध्या तीन कोटी 49 लाख कुटुंबाकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहे.
उज्वला योजनेतील 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना केंद्राच्या तीनशे रुपये अनुदानावरील रक्कम राज्य सरकार देणारा असून, त्यासाठी वार्षिक 830 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना योजनेचा लाभ घेताना एका कुटुंबात एका शिधापत्रिकेवर किती ही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलेंडर दिले जाईल.
गॅस जोडणी महिलांचे नावे असली तरच लाभ मिळेल. या अटीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणता अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी, मोफत गॅस सिलेंडरचा लाभ साधारण दीड कोटी कुटुंबांना मिळणार आहे.
उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकार एक गॅस सिलेंडर मागे तीनशे रुपये अनुदान देते तर, एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत 830 रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे तीन सिलेंडरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारचा अंतिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील जनतेला खुश करण्यासाठी युती सरकारने विविध योजनांची घोषणा केली. कारण ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहे त्यामुळेच सर्वसामान्य जनतेला कसे खुश करण्यासाठी सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. त्यातलीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 होय.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबांना स्वस्त दरात गहू, तांदूळ आणि अन्य खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून राज्यातील प्रत्येक व्यक्तीला दोन वेळेचा अन्न मिळू शकेल. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातील गरीब नागरिकांना वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्यात येणार आहेत. या योजनेचा महाराष्ट्रातील होणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये सांगण्यात आले की, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. चला तर मग आपण योजनेची संपूर्ण माहिती पाहूया. या योजनेचे लाभार्थी कोण आहे ? तिचे वैशिष्ट्य काय आहे ? त्याचा फायदा कोणाला मिळणार आहे ? याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे काय-
महाराष्ट्रातील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न युती सरकारने केला आहे. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 ची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून 5 सदस्य असलेल्या कुटुंबांना आता वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.
यात विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांना पूर्ण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि गरजूंना अन्नसुरक्षा प्रधान करण्यात येणार आहे. यातून त्यांना गहू, तांदूळ आणि अन्य खाद्य पदार्थ स्वस्त आणि सुलभ उपलब्ध करून देणे हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे राज्यातील दुर्लभ घटकातील लोकांना आवश्यक सुविधा मिळतील. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लहान आणि गरीब परिवारांना मोठा फायदा होणार आहे असे अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश-
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे.
- मुख्यमंत्र्यांना पूर्ण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारद्वारे गरिबांना स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
- स्वस्त दरात पौष्टिक अन्न पदार्थ उपलब्ध करून नागरिकांचे आरोग्य आणि पोषण स्तर सुधारणे हा एक उद्देश ठेवण्यात आला आहे.
- आता या योजनेच्या माध्यमातून सरकार पाच सदस्य असलेला कुटुंबांना प्रत्येक वर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची पात्रता-
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेचा लाभ केवळ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांनाच घेता येणार आहे.
- लाभार्थी व्यक्तीकडे स्वतःच्या नावाचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील नागरिकांना घेता येणार आहे.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न सरकारने निश्चित केलेल्या मर्यादित असणे आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची वैशिष्ट्ये-
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना विशेष करून राज्यातील गरीब नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून 52.4 लाख कुटुंबांना प्रत्येक वर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.
- महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या माध्यमातून पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
- ज्याप्रमाणे केंद्र सरकारकडून विविध योजना चालवल्या जातात त्याच प्रकारे महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे.
- लाभार्थ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात अन्न उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- लाभार्थी कुटुंबांना स्वस्त दरात तांदुळ, गहू आणि अन्य खाद्यपदार्थ या योजनेच्या माध्यमातून पुरविले जाणार आहेत.
- राज्यांतील एकही व्यक्ती रात्री उपाशी पोटी नये यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे, जेणेकरून सर्वांना दोन वेळेचे जेवण मिळेल.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत-
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची आधिकृत वेबसाइड राज्य सरकारने अद्याप अधिसूचित केलेली नाही. सर्व पात्र अर्जदार अधिकृत वेबसाईट किंवा शासन निर्णय पाहून योजनेची माहिती घेऊ शकतात आणि एकदा सरकारने अधिकृत वेबसाईट जाहिर केल्यानंतर तेथे फॉर्म भरू शकतात. यासाठी लाभार्थ्याकडे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- गॅस जोडणी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- ओळखपत्र
- उज्ज्वला व लाडकी बहीण योजना नोंदणी
आदि कागदपत्रे असावीत.
FAQ's
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे काय?
महाराष्ट्रातील दारि्र्यरेषेखालील आणि आथिर्क दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 52.4 लाख पात्र कुटुंबीयांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण?
महाराष्ट्रतील दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व नागरिक ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे. त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ काय?
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. त्याबरोबरच स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा