सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ! किती मिळते सरपंच आणि उपसरपंच यांना मानधन, जाणून घ्या ?

सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ! किती मिळते सरपंच आणि उपसरपंच यांना मानधन, जाणून घ्या ? - Sarpanch Salary Hike : सरपंच व उपसरपंच यांचा पगार गावातील लोकसंख्येनुसार ठरतो. सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ Sarpanch Salary Hike: कोणत्याही गावाच्या ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो. गावातील ग्रामपंचायतीचा सर्व कारभार सरपंचाच्या हाती असतो. सरपंचाला ग्रामपंचायतीचे काम व जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी ग्रामसेवक मदत करतात. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (23 सप्टेंबरला) एक्स वर एक पोस्ट घेतली. त्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची यादी होती. या यादीतील एक महत्त्वाचे निर्णय हा राज्यातील सरपंच आणि उपसरपंचाचे मानधन दुप्पट करण्याबाबतचा होता. या निर्णयाच्या निमित्ताने सरपंच व उपसरपंच यांना किती मानधन मिळते, ते जाणून घेऊयात. राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच...