लखपती दीदी योजना, आता महिलांना मिळणार 1 ते 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज
लखपती दीदी योजना असा करा अर्ज-
देशभरातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने लखपती दीदी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा देशातील 83 लाख बचत गटशी जोडल्या गेलेल्या तब्बल 9 कोटी महिलांना होणार आहे.
![]() |
लखपती दीदी योजना |
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 01 फेब्रुवारी 2024 रोजी सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी महिलांच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या अनेक उपाययोजनांची माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी लखपती दीदी योजनेचा विस्तार करत असल्याची घोषणा केली. ही योजना म्हणजे नक्की काय? महिलांना योजनेचा कसा लाभ होतो? याविषयी अधिक जाणून घेऊ.
ठळक मुद्दे-
- लखपती दीदी योजना म्हणजे काय
- 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य
- लखपती दीदी योजनेची वैशिष्ट्ये
- लखपती दीदी योजनेचे फायदे
- लखपती दीदी योजना 2024 पात्रता काय आहे
- लखपती दीदी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- लखपती दीदी योजनेचा अर्ज कसा करावा
लखपती दीदी योजना म्हणजे काय?
गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. ग्रामीण भागातील महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना बचत गटामार्फत प्रशिक्षण देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर 2023 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केली. आता सरकारने या योजनेचा विस्तार करत देशातील तीन कोटी महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचे लक्षणे असल्याचे जाहीर केले आहे.
लखपती दीदी योजने बद्दल महत्वाचे-
लखपती दीदी योजनेतून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच बचत गट अशी संबंधित असलेल्या महिलांना सरकारकडून कर्ज उपलब्ध करून दिल्या जात आहे. लखपती दीदी या योजनेच्या अंतर्गत उत्तराखंड राज्य सरकार महिला आवश्यक गटांना बिनव्याजी पाच लाख रुपयांच्या कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे महिलांना लखपती बनवण्यास मदत होते. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक राज्य सरकार देखील आर्थिक मदत करत आहेत. विशेष म्हणजे यात बचत गटामध्ये बँक वाली दीदी. अंगणवाडी वाली दीदी. आदींचा समावेश आहे. अंतर्गत बचत गटाशी संबंधित जवळपास दहा कोटी महिलांना एलईडी बल, ड्रोन दुरुस्ती, प्लंबिंग, आदी बाबतचे प्रशिक्षण देऊन महिलांना लखपती म्हणजे स्वावलंबी बनवले जाईल
15 ऑगस्ट 2024 रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. लखपदीदी ही योजना देशभरातील महिलांसाठी चालवल्या जात असलेल्या बचत गटाशी संबंधित आहे. लखपती दीदी हा एक महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम असून याद्वारे देशभरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. लखपती दीदी योजनेस पात्र असलेल्या महिलांना समय रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी एक ते पाच लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते. आर्थिक दृष्ट्या वंचित असलेली महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी ही योजना केंद्र सरकार राबवत आहे.
योजनेबाबत काही महत्त्वाचे मुद्दे -
- योजनेचे नाव- लखपती योजना
- कधी सुरू झाली- 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरून घोषणा करण्यात आली
- कीती मिळणार कर्ज- 1 ते 5 लाखाचे बिनव्याजी कर्ज
- कोणाला मिळणार लाभ- बचत गटाशी संबंधित असलेल्या महिलांना
- उद्देश- महिलांना लखपती बनवणे
- अर्ज प्रक्रिया- ऑनलाइन/ऑफलाइन
- अधिकृत वेबसाईट- https://lakhpatididi.gov.in/
लखपती दीदी योजनेचे वैशिष्ट्ये-
- केंद्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी सुरू केली आहे.
- प्रत्येक महिलेला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 1 ते 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे.
- आतापर्यंतचा बले कुठे महिलांना लखपदी दीदी बनवले गेले आहे.
- यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचे लक्ष ठेवले आहे.
- महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात येतात.
- या योजनेअंतर्गत महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते.
- महिलांना योजनेअंतर्गत छोटे कर्ज सहज उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म कर्ज सुविधा देण्यात आली आहे.
- लखपती दीदी योजना कौशल्य विकास आणि व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे काम करते.
- लखपदी दिदी योजनेअंतर्गत उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते.
- महिलांना डिजिटल साक्षर करण्यासाठी डिजिटल बँकिंग सेवा, डिजिटल प्लॅटफॉर्म पेमेंट, आणि मोबाईल वॉलेट वापरण्यासाठी मार्गदर्शनही प्रोत्साहित केले जाते.
- या योजनेद्वारे महिलांना विमा संरक्षण आणि आर्थिक सुरक्षा दिली जाते.
- महिलांचे आत्मविश्वास वाढविण्यासाठी अंतर्गत विविध सशक्तिकरण कार्यक्रम चालवले जातात.
लखपती दीदी योजनेचे फायदे :
देशभरातील महिलांना आपल्या पायावर उभे करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा लखपती दीदी योजनेचा उद्देश आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना आणि बचत गटांना विविध प्रकारचे फायदे मिळतात.
लखपती दीदी योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे दिली जातात.
यात व्यवसाय योजना, मार्केटिंग धोरणे, आणि बाजारात आपले उत्पन्न कसे पोहोचवावे आदी बाबत माहिती दिली जाते.
लखपती दीदी योजना महिलांना आर्थिक सुरक्षिततेसाठी कमी खर्चात विमा संरक्षण येथे आणि आर्थिक मदतही दिली जाते.
या योजनेअंतर्गत सरकार एक कार्यशाळा आयोजित करते, या कार्यशाळेत बचत, गुंतवणूक, बजेट, आर्थिक पर्यायांशी संबंधित माहिती दिली जाते.
या योजनेअंतर्गत महिलांना बचत करण्यासाठी त्यांच्या मनात उत्साह निर्माण केला जातो.
लखपती दीदी योजनेने महिलांना कर्ज सुविधा दिली आहे. ज्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय मुलांची शिक्षण किंवा इतर काही गरज यासाठी मदत होते. एवढेच नाही तर काही सरकार त्यांना बिनव्याजी कर्ज सुविधा देखील देतात.
लखपती दीदी योजना 2024 पात्रता काय आहे :
ही योजना संपूर्ण राज्यात राबवली जात आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याने आपापल्या पद्धतीने या योजनेची पात्रता ठरवली आहे. त्यापैकी काही सामान्य पात्रतेची माहिती खालील प्रमाणे.
लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी ती महिला ही त्या राज्यात कायमस्वरूपी रहिवास असणे आवश्यक आहे.
त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
जर त्या महिलेचे वय 18 वर्षे ते 50 वर्षाच्या दरम्यान असेल तरच ती महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
लखपती दीदी योजनेसाठी फक्त आणि फक्त महिलाच अर्ज करू शकतील. लखपती दीदी योजनेसाठी बचत गटाशी संबंधित असणे बंधनकारक आहे (आवश्यक) आहे.
लखपती दीदी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
लखपती दीदी योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा (उदा. आधार कार्ड लाईट बिल)
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
तुम्ही तुमच्या नजीकच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रातून मिळू शकता. यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे तुम्ही गोळा करा. यात आधार कार्ड, बँक खाते पासबुक, स्वयंसहायता समूह (SHG) नोंदणी प्रमाणपत्र आणि व्यवसाय योजनांचा समावेश आहे.
लखपती दीदी योजनेसाठी कसा करावा अर्ज ?
या योजनेचा अर्ज करण्यासाठी संबंधित अंगणवाडीशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सरकारच्या या अधिकृत वेबसाईटला https://r.search.yahoo.com/_ylt=AwrKBzCfv9pmVo8AD327HAx.;_ylu=Y29sbwNzZzMEcG9zAzEEdnRpZAMEc2VjA3Ny/RV=2/RE=1726821535/RO=10/RU=https%3a%2f%2flakhpatididi.gov.in%2f/RK=2/RS=zuwtDrhoUGPVGu0JfJhSHN6NCgQ- भेट देऊ शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा