पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 जाणून घ्या, काय आहे योजना ? आणि अर्ज कसा करावा ?
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 जाणून घ्या, काय आहे योजना ? आणि अर्ज कसा करावा ?
![]() |
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 |
महाराष्ट्र सरकार महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असते. यातच आता महाराष्ट्र राज्याची देशात सर्वाधिक महिला नवउद्योमी म्हणून ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने महिलांना पारवर देण्याचा निर्णय घेतला आहे.
महिलांना नवउद्योमीसाठी राज्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखाली नवउद्योमींना त्यांचा उलाढालीनुसार एक ते पंचवीस लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकार महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकीच आज आपण एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्र पुण्यश्लोक आहिल्यादेवी महिला स्टार्टअप योजना. या योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने 24 जून 2024 रोजी केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करताना केली. या योजनेअंतर्गत महिला एक ते पंचवीस लाखांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. महिलांच्या स्टार्टअप्सला निधी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपला आर्थिक मदत मिळेल आणि त्यांचा व्यवसायात वाढ होईल.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना महिलांच्या स्टार्टअपला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवते व महिलांना सक्षम होण्यास मदत करते. या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपला आर्थिक मदत होते. आता स्टार्टअप मध्ये महीला नेतृत्व करताना दिसत आहेत. परंतु त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना आथिर्क अडचण आणि अपुरा निधी त्या अयशस्वी ठरतात.
शाळा महाविद्यालय या मधून तरुण महिलांनी सुरु केलेल्या किंवा सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना स्टार्टअप सुरु करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनतील व बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल, ही योजना कौशल्य रोजगार उद्योजकता आणि इनोवेशन विभागांतर्गत चालवली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटी दरम्यान असणे आवश्यक आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण महिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची संपूर्ण माहिती, या योजनेचे फायदे, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, पात्रता काय आहे, या योजनेसाठी कसा करावा अर्ज, या संपूर्ण गोष्टींची माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
ठळक मुद्दे -
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 माहिती
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे फायदे
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची पात्रता
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे कागदपत्रे
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची अर्ज प्रक्रिया
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 माहिती -
योजनेचे नाव- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना
कधी सुरू झाली- 2024
लाभार्थी- उद्योजक महिला
विभाग- कौशल्य रोजगार उद्योजकता आणि ईनोवेशन विभाग
फायदे - महिलांचा नेतृत्वाखाली स्टार्टअप साठी आर्थिक मदत करणे
अर्ज प्रकिया- ऑनलाईन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे फायदे:-
या योजनेअंतर्गत स्टार्टअप साठी आर्थिक मदत केली जाते.
या योजनेअंतर्गत महिलांना स्टार्टअप सुरु करण्यासाठी 1 ते 25 लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाते.
या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर व स्वावलंबी बनतील.
देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.
महिला स्टार्टअप योजनेचे उद्दिष्ट राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्ट अप्सना आर्थिक पाठबळ देणे.
राज्यातील महिला स्टार्टअप ला आत्मनिर्भर बनवणे व स्वावलंबी बनवणे.
या योजनेअंतर्गत महिला व स्टार्टअप च्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणे.
या योजनेअंतर्गत महिलांना स्टार्टअप साठी आर्थिक मदत करून देशातील बेरोजगारी कमी करणे.
राज्यातील महिला नेतृत्वाखाली प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप ला एक ते 25 लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची पात्रता:-
अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
स्टार्टअपला डीपीआयआयटी आणि एमसीएम मध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे.
स्टार्टअप ची नोंदणी महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे.
महिला लाभार्थीचा तिच्या कंपनीमध्ये किमान 51% हिस्सा आवश्यक आहे.
महिला लाभार्थीचे स्टार्टअप एका वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्वीचे असावे.
स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल 10 ते 1 कोटी दरम्यान असणे आवश्यक आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे कागदपत्रे:-
- एमसीए प्रमाणपत्र
- dp प्रमाणपत्र
- लेखापरीक्षण अहवाल
- कंपनीचा लोगो
- संस्थापकाचा फोटो
- उत्पादन सेवा फोटो
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला होळकर महिला स्टार्टअप योजनेची अर्ज प्रक्रिया:-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
या योजनेच्या अर्जाची शेवटची तारीख ही अद्याप ठरलेली नाही
या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदारला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यानंतर एक अर्ज उघडेल, त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल. अर्ज मध्ये खालील माहिती असेल ( स्टार्टअप चे नाव, महिला संस्थापक नाव, कंपनीचे नाव, ई-मेल, श्रेणी निवड, मोबाईल नंबर, स्टार्टअप चा संघ, आकार, स्प्रे सेक्टर निवडा, कंपनीचा प्रकार निवडा, स्टार्टअप ची नोंदणी तारीख, क्रमांक, कंपनीची वेबसाईट, कंपनीचा पत्ता, जिल्हा, शहर, स्टार्टअप बद्दल वर्ण, स्टार्टअप च्या समस्येला तोंड देत आहे त्याचे वर्णन, सेवा / उत्पादनांचे वर्णन, स्टार्टअप च्या मोठ्या प्रमाणावर होणारा परिणाम स्पष्ट करा, उलाढाल तपशील इत्यादी ).
संपूर्ण अचूक पद्धतीने भरा त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
वरील योजनेची घोषणा ही काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची वर्धा येथे झालेल्या बैठकीमध्ये घोषित करण्यात आलेली असून ही योजना महिलांसाठी उपयुक्त आणि महत्त्वाचे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा