द्राक्ष, डाळिंब शेतीत शिंदे बंधूंचा लौकिक
द्राक्ष, डाळिंब शेतीत शिंदे बंधूंचा लौकिक -
![]() |
शेतीतून प्रगतशील झालेले नागनाथ आणि बंडू हे शिंदे बंधू व एकत्रित परिवारातील सदस्य. |
सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथील नागनाथ आणि बंडू या शिंदे बंधूनी द्राक्ष-डाळिंब शेतीत मास्टरी मिळवली आहे. एकरी उत्पादक ते सह गुणवत्तेतही सातत्य ठेवले आहे. त्यामुळेच दरवर्षी फळांना बाजारात चांगला उठाव व दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांचा शेतीतील अभ्यास व प्रयोगशीलता यामुळे प्रगतशील शेतकरी म्हणून शिंदे बंधूंचा लौकिक वाढला आहे.
सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील निमगाव (टें) हे मूळ गाव असलेल्या नागनाथ व बंडू या शिंदे बंधूंचे गावापासून टेंभुर्णी-कुरडवाडी महामार्गावर शिराळ (मा) येथे 22 एकर शेती आहे. सुमारे 15 वर्षापासून त्यांना शेतीचा अनुभव आहे. वडील हरिदास शेतीत करीत. दोघा शिंदे बंधूंचे शिक्षण जेमतेम दहावी बारावीपर्यंत झाले आहे. मात्र एखाद्या उच्चशिक्षित अभ्यासू शेतकऱ्याप्रमाणे त्यांनी द्राक्ष-डाळिंब शेतीत मास्टरी संपादन केली आहे. त्यांची पूर्वीची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती. नागनाथ यांनी 1997 मध्ये बारावीचे शिक्षणानंतर हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरी स्वीकारली. तर बंडू यांनी दहावीनंतर वडिलांसोबत शेतीला सुरुवात केले. त्या काळी या भागात पाण्याचा फारसा स्त्रोत नव्हता. पुढे 2005 मध्ये सीना-माढा उपसा योजना झाली. ऊस, केळी यांसारखी पिकी होऊ लागली. 2017 मध्ये पैशांची जुळवाजुळव करून धाडसाने या योजनेच्या सहाय्याने तीन किलोमीटरवरून पाईपलाईन केली. दोन एक रात चार कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले.
यशाची पाठ सोडली नाही-
![]() |
शेडमध्ये बेदाणा निर्मिती |
शेततळ्यातून पाण्याचा शाश्वस्त्रोत तयार झाला. त्यानंतर ऊस, केळीची लागवड केली. मात्र त्यातून समाधानकारक यश अद्याप मिळत नव्हते. मग कापसेवाडी चे प्रयोगशील द्राक्ष उत्पादक नितीन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली 2018 मध्ये द्राक्ष शेतीचा विचार केला. सोबतच औदुंबर कुबेर यांच्या मार्गदर्शनातून डाळिंब शेतीचा निर्णय घेतला. पाण्याचा खात्रीचा स्त्रोत, अभ्यासुवृत्ती, कष्ट व योग्य पद्धतीचे व्यवस्थापन यातून द्राक्ष व डाळिंब क्षेत्रात यश मिळत गेले. आज 22 एकरात 13 एकर द्राक्षे तीन एकर डाळिंब आहे. अडचणी, उपाय, गुणवत्ता, 'मार्केट' यांचा सतत अभ्यास यातून मागील चार वर्षात या दोन्ही पिकाच शिंदे बंधूंनी चांगला हातखंडा निर्माण केला. प्रत्येक हंगामात त्यांना यशाची चव चाखायला मिळाली आहे.
व्यवस्थापनातील ठळक बाबी -
![]() |
डाळिंब बागेला केलेला आच्छादन |
डाळिंबाचे भगवा वान लावले आहे. मार्चमध्ये बहर धरला जातो. सप्टेंबर मध्ये काढणी पूर्ण होते, दर ऑक्टोबर मध्ये एकरी चार ट्रॉली शेणखताचा वापर होतो. डिसेंबरमध्ये बाग तानावर सोडली जाते. फेब्रुवारीमध्ये बागेची पानगळ केली जाते. मार्चमध्ये पुन्हा छाटणी व बाग स्वच्छ करून बहर धरला जातो. बहारानंतर तिसऱ्या महिन्यात (मेच्या सुमारास) फळे लिंबाच्या आकाराची झाल्यानंतर 'प्रोटेक्शन पेपर' चा वापर होतो. त्यामुळे फळांची उन्हापासून संरक्षण होण्याबरोबर रंग आणि चकाकी ही चांगली मिळते. द्राक्षाचे थॉमसन वान आहे. पाच शेड्स उभारून दर्जेदार बेदाणा तयार केला जातो. माती, पाणी, देठ यांच्या तपासणी नुसार अन्नद्रव्यांची मात्रा दिली जाते.
एकत्रित कुटुंबाचे प्रगतीला बळ -
![]() |
शिंदे बंधूंच्या फळबागेचे नजरेत भरणारे समृद्ध शिवार |
सुमारे 11 सदस्यांचे शिंदे यांचे एकत्रित कुटुंब आहे. आपल्याला शिक्षण घेणे शक्य झाले नसले तरी मुलांना मात्र उच्च शिक्षण देण्यात शिंदे बंधूंनी कोणती कसर ठेवलेली नाही. नागनाथ यांची मोठी मुलगी निकिता कृषी पदवीधर असून स्नेहा 'BAMS' तर मुलगा निखिल कृषी पदवीचे शिक्षण घेतो आहे. बंडू यांची मुलगी प्राजक्ता बी फार्मसी तर मुलगा रोहन बारावीत आहे. नागनाथ यांच्या पत्नी सौ. सविता आणि बंडू यांच्या पत्नी सौ. सुनीता या दोघेही शेतीत हिरीरीने सहभाग घेतात. एकत्रित कुटुंबाची ताकद हीच शेतीतील प्रगतीचे प्रमुख बळ ठरली आहे.
उत्पादनात सातत्य, उत्कृष्ट दर -
![]() |
गुणवत्ता पूर्ण फळाचे उत्पादन |
मागील चार वर्षात द्राक्ष व डाळींबाचे एकरी दहा ते पंधरा व काही प्रसंगी त्याही पुढे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. सन 2022 मध्ये बेदाण्याला प्रति किलोला 175 रुपये, तर 2023 मध्ये एकरी साडेचार टन उत्पादित एकरी सरासरी साडेचार टन उत्पादन घेतले असून, त्यात पण 150 रुपयांपर्यंत दर मिळवण्यात शिंदे बंधू यशस्वी झाले आहेत. डाळिंबाला ही सातत्याने प्रति किलो 90 ते 100 रुपये दर मिळवला आहे. यंदा 2024 एकरी सरासरी उत्पादन किलोला सर्वाधिक 180 रुपये दर मिळवला आहे. फळांच्या गुणवत्तेबाबत कधीच तडजोड केली जात नाही. म्हणून डाळिंब खरेदीसाठी थेट निर्यातदार दरवर्षी शेतावर येऊन जागेवर खरेदी करतात डाळिंब दुबईसह आखाती देशात निर्यात केली जाते.
शिंदे बंधू यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा संपर्क :-
नागनाथ शिंदे :- ९४२०४९२२४४
बंडू शिंदे :- ९४२३०६६६८८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा