मुलींना शिक्षण मोफत देण्यात यावे यासाठी नविन योजना
मुलींना शिक्षण मोफत देण्यात यावे यासाठी नविन योजना -
आता पालकांना मुलीसाठी एक रुपया पण शिक्षणावर खर्च करण्याची गरज नाही मुलींच्या शिक्षण खर्चाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. जून 2024 पासून मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार द्वारे केला जाणार आहे.
![]() |
मुलींना मोफत शिक्षण योजना महाराष्ट्र |
मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 संपूर्ण माहिती :-
मित्रांनो पुढे पाहूयात काय आहे मुलीच्या मुंबई शिक्षण योजना आणि त्यासाठी काय असणार अशी पात्र निकष सविस्तर माहिती.
मुलींना मोबाईल शिक्षण या योजनेची घोषणा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असून, येत्या जून 2024 पासून या योजनेचा लाभ राज्यातील गरीब मध्यम वर्गातील मुलींना होणार असून सगळ्याच मुलींना उच्च शिक्षण अगदी मोफत घेता येणार आहे.
इंजनीअरिंग, मेडिकल, तंत्रशिक्षण सारख्या न परवडणाऱ्या खर्चिक शिक्षणा सोबत एकूण 800 कोर्स मध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणारं आहे. या संबंधी अधिकृत घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
अलीकडच्या काळात शाळात, महाविद्यालये यांच्या प्रवेश शुल्कात भरमसाट वाढ झाल्याची दिसत आहे. यामुळे गरीब, मध्यम वर्गातील मुले- मुली अतिशय हुशार असून देखील केवल प्रवेश फी आधिक असल्यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित झाल्याचे दिसत आहे.
महागाई आणि बेरोजगारी नियंत्रण झालेली जनता मराठा युद्ध मनोज रंग पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारून लढा देत आहे. म्हणूनच गरीब मध्यमवर्गातील मुलींसाठी ही आनंदाची बातमी आहे. या योजनेमुळे राज्यातील सर्वच मुली उच्चशिक्षित होणार आहे.
Contents:-
मुलींना मोफत शिक्षण योजना सन 2024 संपूर्ण माहिती
मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 पात्रता निकष
मुलींना मोफत शिक्षण 2024 आवश्यक कागदपत्रे
मुलींना व प्रशिक्षण योजना 2024 शाळा महाविद्यालय प्रवेश माहिती
मुलींना मोफत शिक्षण केवळ व्यवसायिक अभ्यासक्रमासाठीच
मुलींना मोफत शिक्षण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 पात्रता आणि निकष :-
मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे...
मोफत शिक्षण घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असावे
महाराष्ट्र राज्यातील मुली ह्या योजनेसाठी पात्र असतील
मुलींचे आई-वडील महाराष्ट्रात कायमस्वरूपी राहत असावेत
पात्र मुलींना येत्यात जून 2024 पासून उच्च शिक्षण फ्री मध्ये मिळणार आहे.
योजनेबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे :-
योजनेचे नाव- मुलींना व प्रशिक्षण योजना
राज्य- महाराष्ट्र राज्य
वर्ष- 2024 2025
घोषणा- उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
सुरुवात- जून 2024
उद्देश- गरीब कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देणे
लाभ- मेडिकल तंत्रशिक्षण इंजीनियरिंग सारख्या आठशे प्लस कोर्समध्ये शिक्षण घेण्याची संधी
लाभार्थी- गरीब कुटुंबातील महाराष्ट्रातील सर्व मुली
मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 आवश्यक कागदपत्रे :-
मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत....
अर्जदार मुलीचे आधार
कार्ड कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र दाखला
रहिवासी प्रमाणपत्र डोमासईल प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
मागील वर्षाचे गुणपत्रक मार्कशीट
मुलीच्या पासवर्ड साईज फोटो
आवश्यक कागदपत्र हे जून महिन्याच्या आधीच जमा करून ठेवल्यास प्रवेश प्रक्रियेला विलंब होणार नाही. तसेच वरील कागदपत्रे ही मूळ प्रत सह झेरॉक्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 शाळा महाविद्यालय प्रवेश माहिती :-
मोफत शिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील गरीब मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे. यामध्ये Private school, CBSC School, Government Schools Colleges यांसारख्या शाळा कॉलेजमध्ये फ्री शिक्षण (Free Education) घेता येणार आहे.
या योजनेचा लाभ जून 2024 पासून घेता येणार आहे मोफत प्रवेश प्रक्रिया (Free Admission Process) जून पासूनच महाराष्ट्र राज्यात सर्वत्र चालू होणार आहे.
प्रवेश घेताना या योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही, तुम्हाला हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश करताना ऍडमिशन फॉर्म सोबतच वर दिलेल्या कागदपत्र जोडायचे आहे. सर्व पात्र मुलींना उच्च शिक्षणासाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे.
मुलींना मोफत शिक्षण केवळ व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी च
राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी मोफत शिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे.
व्यवसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत यासाठी मंत्रिमंडळाच्या 5 जुलै रोजी झालेल्या बैठकीत झालेला घेण्यात आला होता. 2024-2025 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 906 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी च लागू असून, कला, वाणिज्य व विज्ञान इत्यादी पारंपारिक शाखांसाठी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण तसेच औषधी द्रव्य विभाग, कृषी व संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या अखत्यारीतील शिक्षण संस्थांमध्ये राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक, व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) इतर मागास प्रवर्ग (OBC) इत्यादी मुलींना परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क यामध्ये 50% सवलती ऐवजी 100% सवलत शासन देणार आहे.
मुलींना मोफत शिक्षण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया :-
मुलींना मोफत शिक्षण या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने नुकतेच ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. सर्व पात्र मुलींनी या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आव्हान सरकारने केले आहे.
मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. त्या पोर्टल वर जाऊन सगळी माहिती व्यवस्थित वाचून अर्ज सबमिट करायचा आहे.
महाडीबीटी पोर्टल ऑनलाईन अर्ज येथे करा : https://mahadbt.Maharashtra.gov.in/
पालकांनो, जर तुमच्या कुटुंबात मुलगी असेल तर "मुलींना मोफत शिक्षण" या योजनेचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा
तसेच इतर गरीब मुलींना या योजनेचा फायदा व्हावा, असे तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही हा लेख महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक घरी कुटुंबापर्यंत पाठवा त्यामुळे आपल्या मुली, बहिणी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्या उच्चशिक्षित होतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा