Iphone 16 ची प्रतीक्षा अखेर संपली, भारतात नव्या Iphone ची किंमत किती, sale कधीपासून होणारं सुरू ?

 Iphone 16 ची प्रतीक्षा अखेर संपली, भारतात नव्या Iphone ची किंमत किती, sale कधीपासून होणारं सुरू ?


Iphone pre-booking: Iphone pre-booking करण्याची तारीख ही आता समोर आला आहे.

IPhone 16 Series

Apple ने सोमवारी रात्री आयफोन 16 आणि आयफोन 16 प्रो सिरीज लॉन्च केली आहे. याव्यतिरिक्त कंपनीने Apple watch series 10, Apple watch ultra 2, Airpods 4 देखील लॉन्च  केले आहेत. नवी सिरीज लॉन्च झाल्यामुळे अखेर आयफोनच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. काय आहे नव्या फोनची किंमत तुमच्या खिशाला परवडणारे असेल का जाणून घेऊया सविस्तर...

आयफोन 16 आणि आयफोन 16 प्रो सिरीज अगदी नव्या शैलीत लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये नवी डिझाईन ॲक्शन बटन, सुधारित कॅमेरा आणि आकर्षक कलर व्हेरिएंट देखील उपलब्ध करण्यात आले आहेत. या फोनची किंमत 79 हजार 900 रुपयांपासून सुरू होत आहे.

Iphone 16 आणि Iphone 16 plus ची किंमत...

Iphone 16 आणि Iphone 16 plus पाच वेगवेगळ्या कलर व्हेरिएंट मध्ये सादर करण्यात आले आहेत. जे Ultramarine, Teal, pink white आणि black रंगात आहेत. यात 128GB, 256GB आणि 512 GB स्टोरेज चा पर्याय उपलब्ध आहे. Iphone 16 ची किंमत 79,900 पासून सुरू होते आणि Iphone 16 plus साधारण 89,000 पासून मिळू शकतो.

 भारतात Iphone 16 plus च्या 128 GB व्हेरियंट ची किंमत 89,900 रुपये असेल. 

भारतात Iphone 16 plus च्या 256GB व्हेरियंट ची किंमत 99,900 रुपये असेल.

भारतात Iphone 16 plus च्या 512GB व्हेरिएंट ची किंमत 1,19,900 रुपये असेल.

Iphone 16 Pro आणि 16 Pro Max ची किंमत...

Iphone 16 Pro (128GB) ची किंमत 1,19,900 पासून सुरू होत आहे.

भारतात Iphone 16 Pro च्या 128GB व्हेरिएंट ची किंमत 1,19,900 रुपये असेल.

भारतात Iphone 16 Pro च्या 256GB व्हेरियंट ची किंमत 1,29,900 रुपये असेल.

भारतात Iphone 16 Pro च्या 512GB व्हेरिएंट ची किंमत 1,49,900 रूपये असेल.

भारतात Iphone 16 Pro च्या 1 TB  व्हेरिएंट ची किंमत 1,69,900 रुपये असेल.

फीचर्स विषयी :- 

I Phone 16 Features 

Iphone 16 मध्ये तुम्हाला 6.1- inch आणि Iphone 16 plus मध्ये 6.7- inch चा डिस्प्ले मिळेल. स्क्रीन ब्राईटनेस 2000 Nits ची आहे. यामध्ये तुम्हाला कॅमेरा कॅप्चर बटन दिसेल, ज्याचा वापर करीत तुम्ही एका क्लिक मध्ये कॅमेराचा एक्सेस मिळू शकता. याशिवाय याचे वापर करते फोटोही क्लिक करू शकतात.

Iphone 16 series चे नवे पिक्चर्स:-

एप्पल इंटेलिजन्स सह नव्या आयफोन सिरीज मध्ये नवे फीचर्स सादर करण्यात आले आहेत. एप्पल इंटेलिजन्स अनेक एआय फीचर्स ने नव्या आय फोन मध्ये प्रवेश केला आहे. तसेच यंदाच्या आयफोन मध्ये नवीन कॅमेरा कंट्रोल बटन देण्यात आले आहे, जेणेकरून तुम्ही कॅमेराचे अनेक फंक्शन कंट्रोल करू शकाल. तसेच, नवीन आयफोन मॉडेल ए 18 आणि ए 18 प्रो चीपसह सुसज्ज आहेत.

भारतात Iphone 16 ची किंमत..

भारतात Iphone 16 Pro च्या 128GB व्हेरिएंट ची किंमत 1,19,900 रुपये एवढी आहे.

भारतात Iphone 16 Pro च्या 256GB व्हेरिएंट ची किंमत 1,29,000 रुपये एवढी आहे.

भारतात Iphone 16 Pro च्या 512GB व्हेरियंट ची किंमत 1,49,900 रुपये एवढी आहे. 

भारतात Iphone 16 Pro च्या 1 TB व्हेरिएंट ची किंमत 1,69,900 रुपये एवढी आहे. 

Iphone 16 सिरीज साठी प्री ऑर्डर आणि सेल -

Iphone 16 सिरीज साठी 13 सप्टेंबर पासून प्री ऑर्डर सुरू होतील. 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:30  वाजल्यापासून तुम्ही नवीन आय फोन  प्री-बुक करू शकाल. प्री-बुकिंगसाठी तुम्ही Apple India च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. याशिवाय, तुम्ही Apple store, Unicorn store, Amazon, Flipkart सारख्या प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्स ना देखील भेट देऊ शकता. याशिवाय कंपनी 20 सप्टेंबर 2024 पासून आय फोन 16 सिरीज सेल सुरू करेल.

एप्पल इंटेलिजन्स-


एप्पल इंटेलिजन्स फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर यामुळे तुमची अनेक कामे सोपी होतील. आपण मजकूर लिहून स्वतःसाठी वैयक्तिक इमोजी तयार करू शकता. एप्पल इंटेलिजन्स फोन आय फोन मधील फोटोही मॅनेज करेल. इतकच नाही तर एप्पल इंटेलिजन्स तुम्हाला मेल लिहिण्यास मदत करेल. सिरी ला व्हॉइस कमांड देऊन तुम्ही कोणत्याही कंटेंट वर फोटो पाठवू शकाल. हे सध्या इंग्रजी भाषेत सुरू करण्यात आले असून, लवकर या इतर अनेक भाषांचा सपोर्ट जोडला जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या

लाडकी बहीण नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार

आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये मुख्यमंत्री वयोश्री योजना..!!