"आनंदाची बातमी! 'लाडक्या बहिणीं'चा तिसरा हप्ता 'या' दिवशी येणार - Ladki Bahin Yojana "

 "आनंदाची बातमी! 'लाडक्या बहिणीं'चा तिसरा हप्ता 'या' दिवशी येणार - Ladki Bahin Yojana " -

Ladki Bahin Yojana:सध्या राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा बोलबाला आहे. या योजनेसाठी 1 कोटी न अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तसेच योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे. एखादी मिळणारे हे पैसे वाचा सविस्तर बातमी......

मुख्यमंत्री लाडकी बहीण


Mumbai Ladki Bahin Yojana: राज्य मंत्रिमंडळाची समोर बैठक पार पडली. निवडणुकीला काही दिवस बाकी असतानाही बैठक पार पडल्यामुळे या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच राज्य सरकारची बहुचर्चित 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' या योजनेतील तिसरा हप्ता कधी द्यायचा याबाबत सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता येणार आहे.

तिसरा हप्ता कधी येणार ? :

 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबर मध्ये रायगड मध्ये होणार आहे. त्यामुळे येत्या 29 सप्टेंबरला 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' या योजनेचा तिसरा हप्ता देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

29 सप्टेंबरला मिळणार तिसरा हप्ता :

 "सप्टेंबर पर्यंत आलेले अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील. अर्ज पडताळणीमुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नाही. अशा अर्जदारांचे पैसे दिले जाणार आहेत. 2 कोटी महिलांना लाभ दिला जाणार आहे. तिसरा हप्त्याला विलंब झाला कारण अनेक महिलांना सुरुवातीच्या दोन महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत. ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अर्ज दाखल केले, त्या अर्जाची पडताळणी आणि छाननी करण्यास विलंब झाला. त्यामुळे या योजनेचा हप्ता देण्यास उशीर झाला. मात्र, आता ही सर्व प्रक्रिया पार पडली आहे. तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल," अशी माहिती ही मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

महायुतीत 70-75 टक्के जागावाटप:- 

पुढे बोलताना तटकरे म्हणाला की, "महायुतीचे विधानसभा निवडणूक जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. 70-75 टक्के जागा वाटपाचा निर्णय झालाय. प्रत्येक निवडणुकीची समीकरण वेगळी असतात. लोकसभा निवडणुकीचा वेगळा भाग होता. विधानसभा निवडणुकीचा वेगळा भाग आहे. आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जात आहोत. रायगडमध्ये सीटिंग जागेवर आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार, या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.

लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता कधी जमा होणार किती कोटी खर्च:-

Ladki Bahin Yojana:  या योजनेसाठी एक कोटी वनाधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तसेच योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. तर जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर असे एकूण तीन महिन्याचे हप्ते लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती, मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली.

Ladki Bahin Yojana: महायुती सरकारची महत्त्वकांक्षी 'मुख्यमंत्री लाडकी बहिण' या योजनेचा तिसरा हप्ता या आठवड्यात यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार असल्याने, महिला वर्गात आनंदाचा वातावरण आहे. दरम्यान, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते ऑगस्ट महिन्यात आलेत. परंतु, कित्येक महिलांचे आधार कार्ड बँकेची लिंक नसल्याने ऑगस्ट महिन्यात या योजनेचा लाभ त्यांना घेता आला नाही. पण ज्यांनी सप्टेंबर पूर्वी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांचे आधार कार्ड लिंक झाले आहे. अशा महिलांनाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण तीन महिन्याचे 4500 रुपये लवकरच खात्यात यायला सुरुवात होणार असल्याची माहिती, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दिली.

योजनेचा महायुती सरकारला फायदा : 

एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणल्यामुळे वीरधकांकडून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे या योजनेचा महायुती सरकारला फायदा होईल. महिलांच्या मतामुळे सरकार पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. सप्टेंबर महिन्यात ज्यांनी अर्ज दाखल केलेत ? आणि 2 महिन्यात या योजनच्या माध्यमातुन किती कोटी रुपये सरकारने महिलांच्या खात्यात जमा केले? असे अनेक प्रश्नही या निमित्ताने विचारले जात आहेत.

तरीही याच महिन्यात पैसे मिळणार:

 गेल्या महिन्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले. मात्र, त्यावेळी अनेक महिलांनी अर्ज दाखल करूनही त्यांच्या आधार कार्ड बॅंकेत संलग्न नसल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक महिलांचा भ्रम निराश झाला होता. यानंतर बँकेत आधार लिंक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाल. त्यामुळे ज्या महिलांना पहिल्या दोन हप्ते मिळाले नाहीत. त्या महिला आपल्या खात्याकडे डोळे लावून बसले आहेत. मुख्य म्हणजे ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये नवीन अर्ज दाखल केले आहेत. त्यांनाही याच महिन्यात पैसे मिळणार आहेत. परंतु त्यांना गेल्या दोन महिन्याचे पैसे मिळणार नाहीत, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, ज्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा पहिल्यांदाच लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार असून, महीला वर्गात आनंदाचा वातावरण आहे.

सरकारची महत्वकांक्षी योजना: 

 मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा महायुती सरकारनं पावसाळी अधिवेशनात केली आहे. यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र पैसे सरकारने महिलांच्या खात्यात जमा केले. या योजनेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. राज्यभर या योजनेची सर्वत्र चर्चे आहे. दरम्यान, या योजनेमुळे महायुती सरकारला फायदा होईल, असे महायुतीचे नेते सार्वजनिक कार्यक्रमात सांगत आहेत. लाडक्या बहिणी या सरकारमधील लाडक्या भावांना विधानसभा निवडणुकीत मतांच्या रूपातून आशीर्वाद देतील, असा विश्वास महायुतीतील नेते व्यक्त करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारसाठी महत्त्वकांक्षी आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाते. परंतु, या योजनेचा लाभ महिला वर्गावर कितपत परिणाम होतो आणि या योजनेमुळे महिला महायुती सरकारला भरभरून मदत देईल का ? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समजेल.

 किती कोटी अर्ज दाखल...? :

 मुख्यमंत्री लाडके बहीण या योजनेच्या माध्यमातून अद्याप पर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. परंतु, या अर्जाची युद्ध पातळीवर छाननी सुरू आहे. तर दोन महिन्याचे पैसे सरकारने महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. या दोन हप्त्यांमध्ये साधारण 5 हजार कोटींच्या वर पैसे सरकारने लाभार्थ्यांना दिले आहेत. या योजनेचा लाभ अधिकारी महिलांना घेता यावा, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या

लाडकी बहीण नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार

आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये मुख्यमंत्री वयोश्री योजना..!!