'पोकरा'मध्ये 21 जिल्ह्यांतील 6959 गावांचा नव्याने समावेश! तुमच्या गावाचे नाव आहे का तपासा...?
'पोकरा'मध्ये 21 जिल्ह्यांतील 6959 गावांचा नव्याने समावेश! तुमच्या गावाचे नाव आहे का तपासा...?
![]() |
Pocra Yojna Maharashtra |
Pocra Yojna Maharashtra 2024 - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याच्या अंतर्गत पोखरा ही योजना येते. ही पोखरा योजना शेतकऱ्यांसाठी बनवली आहे. पोखरा योजनेत मार्फत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम योजना आहे. त्यामध्ये किती टक्के अनुदान दिले जाते व यामध्ये कुठल्या योजना समाविष्ट आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
ही योजना गरजू शेतकऱ्यांना व य योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे पोखरा योजनेअंतर्गत यामध्ये 21 जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत.
हे जिल्हे पुढीप्रमाणे आहेत : अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव या प्रकल्पाला दिलेले आहे ज्ञानदीप देशमुख यांनी कृषी विभागामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे.
यादीत तुमच्या गावाचे नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा
पोकरा योजना महाराष्ट्र 2024
पोखरा योजनेसाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे. त्या समितीचे नाव ग्राम कृषी संजीवनी समितीची (VCRMC) संरचना असे आहे. या समितीमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगत शेतकरी, अनुसूचित जातीतील एक सदस्य, महिला बचत गट प्रतिनिधी असे कार्यकारी सदस्य या समितीमध्ये असतात. तसेच कार्यकारी समितीमध्ये कृषी सहायक, ग्रामसेवक इत्यादी अधिकारी यामध्ये समाविष्ट असतात. Pocra Yojna Maharashtra 2024
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे कार्यपद्धती करावी
www.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने यामध्ये नोंदणी करून पोखरा योजनेसाठी अर्ज करू शकता.
पोकरा योजना महाराष्ट्र 2024
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा चा दुसरा टप्पा निश्चित केला असून, यात नव्याने 21 जिल्ह्यांची 6959 गावांची निवड केली आहे. त्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने 6000 हजार कोटी रुपयांच्या योजना राबविल्यान्यायला शासनाची तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.
शेती आणि शेतीशी निगडित बाबींचा विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजना जागतिक बँकेच्या अर्ज सहाय्याने राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ही योजना यशस्वी झाल्याने नव्याने या योजनेत जिल्ह्याच्या आणि गावांचा समावेश करण्याची मागणी होती. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या मान्यतेने या प्रकल्पात छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव व नाशिक या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यांतील 6959 गावांचा समावेश केला आहे.
या गावांत विविध योजना राबविण्यासाठी अंदाजे 6000 कोटी किमतीच्या जागतिक बँक अर्थ सहाय्यक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा- 2 राबविण्यात शासनाने तत्वता मान्यता देण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा- 2 साठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती असेल. त्यात नियोजन विभाग, वित्त विभाग, सहकार व पणन विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग, जलसंधारण विभागाचे सचिव, प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, कृषी आयुक्त, चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू हे सदस्य असून पोखराचे प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प निमंत्रित सदस्य असतील.
कर्बग्रहण वाढवून शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट सुविधा उपलब्ध करण्यास सहाय्यक करणे, संवर्धित व पुनरुज्जीवीत या हवामान शेती पद्धतीचा वापर करून पिकांची उत्पादकता वाढविणे, पौष्टिक तृणधान्य उत्पादनावर भर देणे, हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी विविध संशोधन संस्थाबरोबर भागीदारी करणे इत्यादी घटकांचा समावेश राहिला असे नमूद केले आहे.
यादीत तुमच्या गावाचे नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा
पोखरा योजनेचा अर्ज करण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतात
- अर्जदाराचा सातबारा व आठ अ चा उतारा
- अर्जदार अनुसूचित जातीतील असल्यास त्याचा पुरावा
- अर्जदार अपंग असल्यास त्याचा पुरावा
पोखरा योजनेमध्ये पुढील प्रमाणे घटक येतात-
- हवामान अनुकूल कृषी परिस्थिती प्रोत्साहन अनुदान देणे. यामध्ये 100% अनुदान दिले जाते.
- हवामान अनुकूल कृषी पद्धती यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते.
- जमिनीमध्ये कर्बग्रहणाचे प्रमाण वाढविणे यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते.
- क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन (खारपाणीग्रस्त गावे) संरक्षक शेती यामध्ये 100% व काही ठिकाणी 50% अनुदान दिले जाते.[Pocra Yojna Maharashtra 2024]
- एकात्मिक शेती पद्धती यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
- जमीन आरोग्य सुधारणे यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
- पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर करणे यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
- पाणी साठवण संरचनांची निर्मिती यामध्ये 100% व काही ठिकाणी 50% अनुदान दिले जाते.
- सूक्ष्म सिंचन यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
- काढणीपक्षात व्यवस्थापन व हवामान अनुकूल मूल्य साखळी प्रोत्साहन. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देणे. यामध्ये शेतकरी गटासाठी 100% अनुदान दिले जाते व भाडेतत्त्वावर कृषी अवजार केंद्र- सुविधा निर्मिती यासाठी 50% अनुदान दिले जाते.
- शेतमाल वृद्धीसाठी हवामान अनुकूल उद्यान्मुख मूल्य साखळ्यांचे बळकटीकरण यामध्ये 50% अनुदान दिले जाते हवामान अनुकूल बियाणे वितरण प्रणाली कार्यक्षमता वृद्धी त्यामध्ये 50% अनुदान दिले जाते. पायाभूत सुविधांचा विकास करणे यामध्ये 50% अनुदान दिले जाते.[Pocra Yojna Maharashtra 2024]
यादीत तुमच्या गावाचे नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हानिहाय समावेश केलेली गावे-
- अकोला- 149
- अमरावती- 454
- बीड- 301
- भंडारा- 291
- बुलढाणा- 310
- चंद्रपूर- 561
- छत्रपती संभाजी नगर- 296
- धाराशिव- 138
- गडचिरोली- 532
- गोंदिया- 293
- हिंगोली- 148
- जळगाव- 319
- जालना- 177
- लातूर- 216
- नागपूर- 553
- नांदेड- 375
- नाशिक- 535
- परभणी- 173
- वर्धा- 383
- वाशिम- 189
- यवतमाळ- 559
यादीत तुमच्या गावाचे नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा
पोकरा योजनेमध्ये कोणकोणते घटक येतात याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली आहे. पोकरा योजनेबद्दल ही माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा