बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! बांधकाम कामगारांना मिळणार 5000 रुपयांची आर्थिक मदत
बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! बांधकाम कामगारांना मिळणार 5000 रुपयांची आर्थिक मदत..
बांधकाम कामगार योजना 5000:
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना तसेच त्यांच्या पाल्यांना पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने खालील प्रमाणे तीन योजना राबविण्यात आलेले आहेत या योजनेचे सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
या योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे 3 प्रकारच्या योजना राबविल्या जातात-
- कामगारांना अवजारे खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य- 5000/-
- कामगारांच्या पाल्यांना प्रतिवर्षी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य- 5000/-
- बांधकाम कामगारांना बोनस सुविधा पाच हजार रुपये- 5000/-
योजनेचे उद्दिष्ट -
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना अवजारे खरेदी करण्यासाठी, दिवाळीत बोनस च् माध्यमातून तसेच पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
कामगाराचे जीवनमान सुधारणे.
1. कामगारांना अवजारे खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य:
बांधकाम कामगार योजना 5000 ही महाराष्ट्र सरकारची कामगारांसाठी राबविण्यात येणारी उपयुक्त अशी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दर तीन वर्षानंतर 5000/- हजार रुपये पर्यंतची आर्थिक मदत करण्यात येते. हे पैसे कामगारांना बांधकाम क्षेत्रात आवश्यक असणारी अवजारेने हत्यारे खरेदी करण्यासाठी देण्यात येतात.
नोंदीत बांधकाम कामगारास प्रती कुटुंब दर 3 वर्षातून एकदा बांधकाम क्षेत्रात आवश्यक असणारी अवजारे/ हत्यारे खरेदी करण्याकरिता 5000/- रुपयांच्या आर्थिक सहाय्य देण्यात येते. जेणेकरून कामगार बांधकाम क्षेत्रात आवश्यक असणारी अवजारे खरेदी करू शकतील व काम करताना कामगारांना अवजारांची कमतरता भासणार नाही लाभाची राशी कामगारांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता, अटी, कागदपत्रे अर्ज करण्याची पद्धत याचे अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
2. कामगारांच्या पाल्यांना प्रति वर्ष 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य:
इयत्ता आठवी ते दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांना प्रतिवर्षी 5000/- हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. जेणेकरून कामगारांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये. व मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहण्याची गरज भासू नये. लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता, अटी, कागदपत्रे अर्ज करण्याची पद्धत याचे अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
3. बांधकाम कामगारांना बोनस सुविधा:
दिवाळी सारख्या मुख्य सणासुदींच्या काळात कामगारांना च्या मुलांना तसेच पत्नीस नवीन कपडे व फटाके खरेदी करता यावे यासाठी बांधकाम कामगारांना प्रतिवर्ष त्यांच्या वेतनानुसार बोनस दिला जातो. लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता, अटी, कागदपत्रे अर्ज करण्याची पद्धत याचे अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
योजनेचा फायदा:
कामगारांना पाच हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत
हत्यार यांनी साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
पात्र बांधकाम कामगारांसाठी फायदेशीर योजना.
पात्रता:
अर्जदार कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करत असणे आवश्यक आहे.
अर्जदाराची किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त साठ वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराने गेल्या तीन वर्षात किमान 90 दिवसांसाठी बांधकाम कामगार म्हणून काम केले पाहिजे.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:
- नोंदणी प्रमाणपत्र: कामगाराचे मंडळात असलेले नोंदणी प्रमाणपत्र
- ओळखीचा पुरावा: आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स
- रहिवासी दाखला: डोमोसाइल (आवश्यक असल्यास)
- पत्ता पुरावा: (विज बिल, टेलिफोन बिल, आधार कार्ड)
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा: (रेशन कार्ड, वीज बिल, आधार कार्ड)
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँकेचा तपशील: बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला: (जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला)
- ग्रामपंचायत कडून ग्रामसेवक कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
अर्ज कसा करावा:
अर्ज महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करावा किंवा आम्ही खाली अर्ज दिलेला आहे तेथून डाऊनलोड करावा.
भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात जमा करावा.
महत्त्वाच्या बाबी:
अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व नियम जाणून घ्या.
आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आपल्याजवळ ठेवा.
अर्जात विचारलेले सर्व माहिती योग्य प्रकारे भरा.
अर्जात खोटी माहिती भरू नका.
लाभार्थ्याने खोटी माहिती भरून लाभ प्राप्त केल्यास त्याच्यावर कडक कार्यवाही केली जाईल आणि लाभाची संपूर्ण राशी वसूल केली जाईल.
अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडा.
अंतिम तारीख हे पूर्वी अर्ज जमा करा.
योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे:
अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्ज अपूर्ण भरल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता असते.
अर्जासोबत आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे न जोडल्यास अर्जदार कामगार इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळातील नोंदणीकृत कामगार नसल्यास.
अधिक माहितीसाठी:
शेजारी योजना आणि योजनेच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे अर्ज करताना तुम्हाला एखादी समस्या येत असल्यास किंवा तुमचे काही प्रश्न असल्यास अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
Dipak Jadhav
उत्तर द्याहटवाDipak Jadhav
उत्तर द्याहटवा