"Adhaar Updation Center's | आधार कार्ड अपडेट करणे झाले सोपे आणि सुलभ; या ठिकाणीही मिळणार सुविधा"

 "Adhaar Updation Center's | आधार कार्ड अपडेट करणे झाले सोपे आणि सुलभ; या ठिकाणीही मिळणार सुविधा"

Adhaar Updation 

Adhaar Updation Center's| आपले आधार कार्ड हे आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा ओळखीचा पुरावा आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड आहे. अगदी नवजात जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध झालेल्या लोकांपर्यंत सगळ्यांकडे आधार कार्ड आहे. कारण आधार कार्ड आपल्या भारतातील ओळखीचा मुख्य पुरावा आहे. परंतु आपल्याला या आधार कार्ड मध्ये वेळोवेळी अपडेट करावे लागतात. जर तुम्हाला देखील तुमच्या आधार कार्ड अपडेट (Adhaar Updation Center's) करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे.

आतापर्यंत आधार कार्ड अपडेट करताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला अत्यंत सुलभ प्रक्रिया मिळणार आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लोक आधार केंद्रावर जाऊन लांब लचक रांगा लावत होते. परंतु आता तसे करण्याची काहीही गरज नाही. यासाठी अत्यंत सोपा पर्याय सरकारने जाहीर केलेला आहे.

पोस्ट इंडिया ने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती शेअर केलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार टपाल विभागाने सार्वजनिक सुविधा लक्षात घेऊन आधार कार्डशी संबंधित सेवा देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची काही गरज नाही. तुम्हाला जर तुमच्या आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन त्यांच्या आधार कार्ड अपडेट करू शकता. परंतु याची शुल्क हे आधार केंद्रावर द्यावे लागणार आहे.

हो भारत सरकारने पोस्ट बोर्ड मार्फत पोस्ट ऑफिस मध्ये आधार नोंदणी आणि अपडेट ( Adhaar Updation Center's) सेवा सुरू केलेले आहे. या पोस्ट ऑफिस आधार केंद्र मध्ये प्रामुख्याने दोन सेवा पुरवल्या जाणार आहेत. याचा नागरिकांना चांगलाच फायदा होणार आहे. आता या सेवा कोणत्या असणार आहे याची माहिती आपण जाणून घेऊया.

आधार नोंदणी |Adhaar Updation Center's-

तुम्हाला जर आजारासाठी नाव नोंदणी प्रक्रिया करायची असेल, लोकांशी बायोमेट्रिक माहिती इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने द्यायची असेल, तर तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला मोफत करता येईल. यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन देखील तुमच्या आधार नोंदणी करू शकता.

आधार अपडेशन |Adhaar Updation Center's- 

जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मध्ये अपडेट करायचे असेल. जसे की, तुमचं नाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, बायोमेट्रिक अपडेट, बोटांचे ठसे, आयरिस यांसारख्या गोष्टी अपडेट करण्यासाठी तुम्ही जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या गोष्टी अपडेट करू शकता.

Also Read-  एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती ( ICDS Bharti ) जाणून घ्या अर्ज प्रकिया


आधार कार्ड ची स्थापना कधी झाली?

 सुरुवात केंद्र सरकारच्या नियोजन मंडळामार्फत जानेवारी 2009 मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. सप्टेंबर-29-2010 ला आधार योजनेअंर्गत पहिल्या क्रमांकाचे वितरण महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावातल्या रंजना सोनवणे या महिलेला करण्यात आले.

आधार कार्ड मूळ आहे की बनावट कसे ओळखायचे?

पोर्टल द्वारे आधार कार्डची सत्यता कशी तपासायची? "आधार क्रमांक सत्यापित करा" सेवेमध्ये प्रवेश करा. प्रदर्शित सुरक्षा कोडसह तुमचा 12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा. सबमिशन केल्यावर, सिस्टम प्रदान केलेला आधार क्रमांक सत्यापित करेल आणि सत्यापन स्थिती प्रदर्शित करेल.

आधार कार्ड किती अंकी संख्या तयार होते?

आधार कार्ड हा 12- अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे, जो युनिक आयडेंटिफीकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने जरी केला आहे. UIDAI ने सप्टेंबर 2023 मध्ये शेअर केलेल्या डेटानुसार, भारतातील 138.08 कोटी रहिवाशांकडे आधार कार्ड आहेत. आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते, अनेक केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचे लाभ मिळू शकतात आणि विविध सेवांमध्ये प्रवेश करू शकतात. आधार आणि त्याचे महत्त्व तपशील समजून घेऊ.


हे ही वाचा-  Government Scheme: शेतकऱ्यांनो! गट शेतीसाठी केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून देते 15 लाखाचे अनुदान अर्ज कसा करायचा जाणून घ्या ?

आधार कार्ड बद्दल महत्त्वाचे-

  • आधार जारी करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव- भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)
  • आधार ग्राहक सेवा क्रमांक- 1947
  • आधार कार्डची सुरूवात- सप्टेंबर 2010
  • आधार कार्डची वैधता- एल जरा वेळ 
  • नावनोंदणी केंद्राची संख्या- 30,000 पेक्षा जास्त 
  • नावनोंदणी संख्या- 138 कोटी (अंदाजे )
  • प्रमुख लोक- 1) नीलकंठ मिश्रा, अध्यक्ष, UIDAI 
  •                    2) अमित अग्रवाल, सीईओ, UIDAI 


Adhar Card

आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे-

आधार नोंदणीसाठी तीन प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असते- 

  1. पत्त्याचा पुरावा ( POA )
  2. ओळखीचा पुरावा( POI )  
  3. जन्मतारीख ( DOB ).

 निष्कर्ष पूर्ण करण्यासाठी वरील कागदपत्रे आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या

लाडकी बहीण नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार

आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये मुख्यमंत्री वयोश्री योजना..!!