अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय! - Anganwadi Workers

 अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय! - Anganwadi Workers

 

 

                           अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ -



अंगणवाडी सेविकांसाठी (Anganwadi Workers) आनंदाची बातमी समोर येत आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting) घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर ज्या सेविकांनी लाडके बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की, आज मंत्री मंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिलामक आहे. मानधनात साधारणतः 50 टक्के वाढ आम्ही केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ -

ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना 3000 अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपये मिळत होते. आता त्यात पाच हजार अधिक मिळणार आहेत. मागच्या वेळेस 3000 वाढवले होते. मात्र, आता 5000 वाढवण्यात आले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यापुढे म्हणाल्या की, अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत अदिती तटकरे म्हणाल्या की, काल प्रशासनाच्या दृष्टीस ही बाब आली. मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जे 37, 38 अकाऊंट आहेत, ते सिल करण्यात यावे, जे फॉर्म भरण्यात आले ते देखिल क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात यावे, जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 1 कोटी 87 लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव माघे राहिले होते, त्यांना तिन्ही महिन्यांचे पैसे आणि ज्यांना आधी 2 महिन्यांचे मिळाले त्यांना या महिन्याचे पैसे मिळतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांना 3000 हजार मानधन वाढ आणि 2000 हजार प्रोत्साहन भत्ता आणि त्यांच्या मदतनिसांना दोन हजार रुपये मानधन वाढ आणि एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला आहे. वित्त विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली असली तरीही वाढ अद्याप हातात न पडल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकांनी सोमवार पासून ( 23 सप्टेंबर ) मुंबईत जेल भरो आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यात सुमारे एक लाख 13 हजार अंगणवाड्या असून त्या दोन लाखापेक्षा जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. या अंगणवाडी सेविकांना सध्या दहा हजार रुपये तर मदतनिसांना सात हजार रुपये मानधन आहे. अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढीच्या मागणीसाठी चार डिसेंबर 2024 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत 52 दिवस राजव्यापी संप केला होता. राज्य सरकारने 14 मार्च रोजी पाच हजार रुपयांची जाहीर केली तर या प्रस्ताव अद्याप कागदावर आहे. अंगणवाडी सेविकांची मागणी सरसकट पाच हजार रुपये वाढीची होती. महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या प्रस्तावना महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली असून, त्याचा लाभ 612 कर्मचाऱ्यांना होणार आहे.

ग्रामीण भागातील अनेक शासकीय कामांना हातभार लावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदनीस यांना अनुक्रमे पाच हजार व तीन हजार रुपये मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव महिला विकास विभागाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आला आहे. 12 ऑगस्ट पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मुंबईत हुतात्मा चौकात आंदोलन करीत आहेत. राज्यात एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका व ६००० मदतनीस आहेत. त्यांना 12000 रुपये मानधन आहे. मदतीचा 8 हजार रुपये मानधन आहे. त्यांच्या मानधनात वाढ व्हावी अशी केली गेली अनेक वर्षांची मागणी आहे. आशा सेविकांच्या मानधन दरमहा 15000 करण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला बळ आले आहे. अंगणवाडी सेविकांना 5000 मदतनीस यांना तीन हजार रुपये वाढ देण्यात यावी असा प्रस्ताव महिला विकास विभागाने वित्त विभागाला दिला आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाडीत मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस तात्पुरता स्वरूपात मानधनावर कार्यरत आहेत. त्यांच्यावर कामाचा असलेला ताण व प्रत्यक्ष मिळणारे मानधन पाहता, त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. या संदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते, तसेच अन्य लोकप्रतिनिधींनी महापालिकेकडे शिफारस केली होती.

या अंगणवाडी सेविकांना सन 2021 मध्ये एक हजार रुपयांची वाढ देण्यात आली होती. त्यानंतर, वाढती महागाई लक्षात घेता, उपायुक्त प्रशांत पाटील यांनी मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांना सादर केला होता. त्यास मान्यता देण्यात आली आहे.

अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात प्रतिमा प्रत्येकी रुपये दोन हजार रुपये व अंगणवाडी मदतनीस यांच्या मागण्यात प्रतिम प्रत्येकी 1600 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य सेविकांना यापुढे 8500 रू. अंगणवाडी सेविकांना 7320 व अंगणवाडी मदतीस यांना सात हजार रुपये एवढे सुधारित मानधन मिळणार आहे. सध्या शहरातील अंगणवाड्यात पाच मुख्य सेविका, 305 अंगणवाडी सेविका व 302 मदतनीस कार्यरत आहेत, अशी माहिती उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.

आयुक्तांनी दुधाची तहान ताकावर भागविली आहे. मुख्य सेविकांना 15000 हजार, सेविकांना दहा हजार तर मदतनिसांना नऊ हजार आठशे रुपये वाढ अपेक्षित होती. मात्र, चुकीच्या पद्धतीने एक तर ही वाढ करण्यात आली आहे. -किरण मोहिते, हितरक्षक सभा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या

लाडकी बहीण नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार

आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये मुख्यमंत्री वयोश्री योजना..!!