कापूस उत्पादकतेत घसरण.... वाचा सविस्तर

भारताच्या तुलनेत ब्राझील, चीन, पाकिस्तानची आघाडी 



Cotton Production Decreases: जगात कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या भारताचे कापूस उत्पादकता गेल्या दशक वरात सतत कमी होत आहे. चीन पाकिस्तानच्या उत्पादकतेपेक्षा ही उत्पादकता कमी आहे. परिणामी कापूस उत्पादनात ही घट येत असून दर्जेदार आणि पुरेशा कापूस पुरवठ्यांचे संकट देशात तयार होऊ लागले आहे. 

Cotton Production Decreases: जनुकीय सुधारित कापूस वान (जीएम) किंवा (3gm) कापूस वाहनाची मागणी गेल्या दशकभरापासून कापूस उत्पादक शेतकरी आणि उद्योगही करीत आहेत. मात्र, या दृष्टीने कोणतेही काम न झाल्याने देशाचे कापूस उत्पादकता व उत्पादन कमी होत आहे. आगामी काळात भारत कापूस आयातदार देश बनेल, असेही संकेत आहेत. देशात रोगराई, गुलाबी बोंड आळी व अन्य समस्यांना प्रतिकारक्षम तक धरणारे कापूस वान उपलब्ध होत नसल्याने शेतकरी त्रासले आहेत. 2005 नंतर देशात कापूस उत्पादन सतत वाढले. उत्पादन सतत वाढले कापसाचे उत्पादकता देशात 350 किलो रुई प्रति हेक्टर वरून 535 ते 540 किलो रुई प्रति एकरपर्यंत पोहोचली.

विविध देशांची मागील तीन वर्षातील सरासरी कापूस उत्पादकता-

(उत्पादकता किलो, रुई प्रति हेक्टरी)

  • ऑस्ट्रेलिया..................... 1800 
  • चीन..............................1200
  •  ब्राझील..........................925
  •  अमेरिका........................912
  •  पाकिस्तान......................700 
  • भारत.............................500

           

Cotton Production Decreases: महाराष्ट्र किंवा देशात अनेक शेतकऱ्यांसह मोठे उद्योग कापसावर अवलंबून आहेत. परंतु पुरेसा कापूस देशात प्रक्रियेसाठी कारखान्यांना मिळेल की नाही, अशी स्थिती तयार होऊ लागली आहे. कापूस आयातदारांच्या रांगेत भारत पुढे बसू शकतो. कारण कापूस उत्पादन सतत कमी होत आहे. रोग प्रतिकारकक्षम, दर्जेदार कापूस वान, ठोस धोरण कापूस पिकाबाबत देशात आणायला हवे.

                                                                                                      - संदीप पाटील, संचालक,
                                                                                    (
खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन)


2013 पर्यंत देशात कापूस उत्पादन 400 लाख गाठीपर्यंत होते. परंतु 2014 नंतर पिकात रोगराई, गुलाबी बोंड आळी व अन्य नैसर्गिक समस्यांनी थैमान घातले. यात शेतकऱ्यांची ही मोठे वित्तीय नुकसान झाले आहे. देशाचे कापूस उत्पादकता जेमतेम 490 ते 500 किलो रुई प्रति हेक्टरी अशी मागील तीन हंगामात राहिलेली आहे.

अन्य देश पुढे-

Cotton Production Decreases: जगात सर्वाधिक कापूस लागवड करणारा देश भारत आहे. परंतु कापूस उत्पादनात भारत मागे पडला आहे. अमेरिका, चीन, ब्राझील, व पाकिस्तान मिळून जेवढी कापूस लागवड होते, त्यापेक्षा अधिकची कापूस लागवड एकट्या भारतात दरवर्षी केली जाते. परंतु कापूस उत्पादकतेत भारत चीन, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझील आधी देशांच्या मागे आहे. भारतात जेवढे कापूस उत्पादन घेतले जाते. त्यापेक्षा अधिकचे कापूस उत्पादन एकटाच चीन घेतो. चीनने मागील दोन हंगामात कापूस उत्पादन 352 लाख गाठीपर्यंत (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन साध्य केले. तर भारताचे कापूस उत्पादन मागील दोन हंगाम 350 लाख गाठी पर्यंत पोहोचू शकले नाही.


हे ही वाचा- 'पोकरा'मध्ये 21 जिल्ह्यांतील 6959 गावांचा नव्याने समावेश! तुमच्या गावाचे नाव आहे का तपासा...?


Cotton Production Decreases: देशात यंदाही गुलाबी बोंड आळी, नैसर्गिक समस्यांनी कापूस पिकाची वाताहत झाली आहे. देशात यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कापूस लागवड सुमारे 11 लाख हेक्टरने घटली आहे. देशातील कापूस लागवड सुमारे 116 लाख हेक्टर वर झाली आहे. यामुळे देशात यंदाचे 2024-25 कापूस उत्पादन 300 ते 310 लाख गाठी एवढेच राहू शकते असा अंदाज आहे.


अशा प्रकारच्या महाराष्ट्रतील नवनवीन योजना आणि शैक्षणीक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करुन व्हॉटसअप चॅनेल जॉईन करा

महाराष्ट्राची पीछेहाट-

Cotton Production Decreases: देशात सर्वाधिक कापूस लागवड करणाऱ्या महाराष्ट्राचे कापूस उत्पादकता फक्त 350 किलो रुई प्रति हेक्‍टरी एवढीच राहिली आहे. कारण महाराष्ट्रात कापसाखाली 92 ते 94% क्षेत्र कोरडवाहू आहे. कमी-अधिक पाऊस आणि गुलाबी बोंड आळीने महाराष्ट्रातील कापूस पिकाची अतोनात हानी 2014-15 पासून केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस लागवड करणाऱ्या जळगाव जिल्ह्याची कापूस उत्पादकता 330 किलो रुई प्रति हेक्टरी एवढीच साध्य होत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या

लाडकी बहीण नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार

आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये मुख्यमंत्री वयोश्री योजना..!!