लाडकी बहीण नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार

लाडकी बहीण नंतर राज्य सरकार लाडका शेतकरी योजना राबवणार-



मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा:

 शेतकऱ्यांनाच मिळणार लाडका शेतकरी योजनेचा लाभ हे शेतकरी असणार पात्र- 

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा वेध असल्याचे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या मतवाढीच्या रणनीतीवर काम करत आहेत. यामध्येच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी 'लाडकी बहीण' योजनेनंतर आता 'लाडका शेतकरी' योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यात आयोजित कृषी महोत्सवात ही घोषणा केली. 'लाडकी बहीण' ' लाडका भाऊ' या योजना नंतर आता 'लाडका शेतकरी' योजना राबविण्याचे घोषणा त्यांनी केली.यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी फक्त 'लाडका शेतकरी' योजना जाहीर करणेच नव्हे तर शेतकऱ्यांना अन्न मदतीची घोषणा केली आहे.सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी हेक्टरी 5 हजार रुपयाची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे .या मदतीची मर्यादा 2 हेक्टर पर्यंत असणारा आहे.याशिवाय शेतकऱ्यांच्या वीज बिलांचीही माफी जाहीर केली आहे.

राजकीय वातावरण आणि शेतकऱ्यांचे आर्थिक संकट यामुळे राज्य सरकार कृषी क्षेत्राकडे वळले आहे. 'लाडकी बहीण'योजनेच्या पार्श्वभूमीवर आता 'लाडका शेतकरी' योजनेची घोषणा केली आहे. नातेवाईक सवलती देऊन मतवाढीची कामगिरी करण्याचा हा प्रयत्न आहे.

किमान आवश्यक कृषी सेवा देऊन शेतकरी मतदारांमध्ये संघटित व्हावे ही सरकारची धोरणे आहेत. त्याच शेतकरी वर्गाला खाजगी लाभ देण्याचा निर्णय आहे. पण या सर्व योजना राजकीय हेतूवर आधारित असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

राज्याचा देशाचा अर्थकारणावर सध्या गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाच्या कल्याणासाठी एकनाथ शिंदे सरकार नवीन योजना जाहीर करत आहे. कृषी क्षेत्रातील लाभार्थींना त्यांचे आर्थिक, सामाजिक व राजकीय ताकद वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. पण कालबाह्य राजकीय हेतुंवर आधारित असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष होण्याचे शक्यता देखील असल्याचे लक्षात येते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

"महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणे होय. आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे. कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आपल्या सरकारचा धोरण आहे. मी आज एवढेच सांगतो, मुख्यमंत्री 'लाडकी बहिण' योजना आणली त्यानंतर 'अन्नपूर्णा योजना' आणली त्यानंतर 'लडका भाऊ'  योजना आणली आता आम्ही 'लाडका शेतकरी' योजना राबणार आहोत सर्व भाऊ लाडके झाले सर्व बहिणी लाडक्या झाल्या आता शेतकरी लाडका होणार" असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणलं आहे.

सोयाबीन आणि कापसासाठी हेक्टरी 5000 ची घोषणा 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत की, आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन अनेक कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचेही कल्याण झालं पाहिजे. आज आपण सोयाबीनला पाच हजार रुपये हेक्टरी आणि कापसालाही 5000 रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत. ही मर्यादा दोन हेक्टर पर्यंत असणार आहे." अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. 

"आता आपण ते ई-पीक पाहणी वगैरे बाजूला ठेवणारा आहोत. ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे. त्या शेतकऱ्यांना आपण 5 हजार रुपये हेक्टरी पैसे देण्याचा निर्णय घेत आहोत. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज बिलही माफ करत आहोत. विरोधक म्हणाले की, मग मागच्या वीज बिलाचं काय? आम्ही शेतकऱ्यांचे येणाऱ्या वीज बिल घेत नाही तर मग थकलेला कसे घेणार? मागेल त्याला शेततळ आणि मागेल त्याला सोलर अशा अनेक योजना सरकारने सुरू केले आहेत" असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

लाडकी बहीण योजनेची संबंध मुख्यमंत्र्यांनी 'लाडकी बहीण' या  महिला उद्धारक योजनेचा ही उल्लेख केला. 'लाडका शेतकरी' ही योजना लाडकी बहीण योजनेच्या पुढील पायरीच म्हणता येईल महिलांसह आता शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकारच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. 

महिला सशक्तीकरण व शेती विषयक योजना यांच्या संयोजनाची ही एक नवी पहाट उजाडली आहे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी लाडकी बहीण योजना राबविली जात असल्याचा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांचा विकास या योजनेतून होणार आहे 

अन्न उत्पादनात वाढवण्यास मदत 

राज्यातील अन्नधान्य उत्पादन वाढविण्यासाठी लाडका शेतकरी योजना महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत त्यांच्या शेती स्तरावर अनेक सकारात्मक बदल आणण्यास मदत करेल. शेती खर्चात घट होऊन त्यांचे उत्पादनातही वाढ होण्यास मदत होणार आहे.

 याही बरोबर, शेती विषयक नवीन तंत्रज्ञान, यंत्रसामग्री वाटप व अन्य सवलतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत नवीन प्रयोग करण्यास वाव मिळेल. आजच्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना हा एक महत्त्वाचा दिलासा म्हणता येईल. आपण शेतकरी सन्मान योजना केंद्राची आणि सहा हजार रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात त्यामध्ये आपल्या राज्याने 6000 हजार आणखीन टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आता शेतकऱ्याला 12000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे 36000 कोटी रुपये आपण दिलेल्या 44 हजार कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की विरोधक म्हणता शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना दिलेला जे आम्ही कधी काढत नाही परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची आवश्यकता आहे.

सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचा कल्याण झाला पाहिजे आणि आज या ठिकाणी 5 हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय, आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचा तेही पीक पाहणी वगैरे आपण थोडा बाजूला ठेवतोय, 7/12 ची नोंद आहे. सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपणास आज घेतोय, आणि त्याचबरोबर लाडका शेतकरी योजना आता आपण शेती पंपानेचे शेती करतात, त्या शेतकऱ्यांना साडेसात एचपी च्या पंपाचा वीज बिल देखील माफ करतोय. 

लाडका शेतकरी योजना अर्ज कसा करावा 

शेवटी मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळे अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. कांद्याचे पण सुरू केली आहे नाशिक, संभाजीनगर, सोलापूर सदरील अर्ज हे महाडीबीटीद्वारे भरले जाणार आहेत.

या शहरात कांदा महा बँक सरकारने सुरू केले कांदा खराब होत आहे त्यामुळे आम्ही सेंटर सुरू करण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारने याकडे लक्ष दिल्यास निश्चित शेतकऱ्यांचे हे हित अधिक काळ टिकेल आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा भाव मिळेल. आम्हाला ते मिळेल आणि म्हणूनच आम्हाला तुमची मदत हवी आहे, आणि मला खात्री आहे की गेल्या अडीच वर्षात आम्ही जे काही प्रस्ताव केंद्राकडे पाठवले आहेत, त्यात एकही प्रश्न कापला गेला नाही, संपूर्ण स्वीकारले गेले.

आणि आपण आता सोलर ला आपण सौर ऊर्जेला प्राधान्य देतोय.  सातारा जिल्ह्यातील मानेची वाडी गावच्या गावचा शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आलं, आता त्या गावांमध्ये शंभर टक्के सोलर सिस्टिम चालू झालेली आहे. असं आपण देखील केलं पाहिजे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढेच सांगतो की, हे सरकार आपलं हे सरकार सर्व सामान्यांस मी आपल्याला एवढेच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आली अन्नपूर्णा योजना आली, लाडका भाऊ योजना आली आहे. आता जे आम्ही तुम्हाला देतोय तर दिले घोषणा केली, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना मी राबवतो आहोत. सर्व बहिणी लाडक्या झाल्या, आमचा शेतकरी देखील लाडका, शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये आहेत का बघा जरा मोबाईलवर बघा आले का 2000 रुपये बटन दाबले पैसे डायरेक अकाउंट मध्ये हे सरकारचे काम आहे.

माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील तिकडे तर बटन दाबाच्या अगोदर पैसे सोडून दिले 14 तारखेपासून पैसे आले. बघा माझ्या बहिणीची बँकेत गेल्या पैसे काढले खरेदी केली, आपल्या मुलांसाठी केली, आपल्या परिवारासाठी केली शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्या महत्त्वाच्या म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या महिला भगिनी करत असतील, आणि आजपासून लाडकी बहीण होती, लाडका का भाऊ होता, आज पासून लाडका शेतकरी योजना आपण राबवूया धन्यवाद अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.

लाडका शेतकरी योजना महाराष्ट्र पात्रता निकष :

  • अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  •  या योजनेचा फक्त जमीनदार शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. 
  • अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  •  अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  •  अर्जदाराकडे जमिनीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  •  अर्जदार शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणी केलेली असावी.

 लाडका शेतकरी योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? 

  • आधार कार्ड 
  • पत्त्याचा पुरावा 
  • उत्पन्न प्रमाणपत्र 
  • जमिनीशी संबंधित पूर्ण कागदपत्रे 
  • पी एम किसान नोंदणी क्रमांक
  •  बँक खाते विवरण 
  • पासवर्ड आकाराचा फोटो 
  •  मोबाईल नंबर

लाडका शेतकरी योजना काय आहे? 

लाडका शेतकरी योजना ही राज्य सरकारने सुरू केलेली योजना असून, या योजनेच्या माध्यमातून ज्यांची पिके उध्वस्त झाली आहेत, अशा गोरगरीब शेतकऱ्यांना योजनेद्वारे आर्थिक मदत केली जाते, राज्य सरकार DBT द्वारे शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांचे आर्थिक मदत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल.

अलीकडेच, महाराष्ट्र राज्य सरकारने सोयाबीन पीक अनुदान योजना सुरू केली आहे, ज्यामुळे दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगामुळेच एखाद्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते. याशिवाय पीएम फसल विमा योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा कमीत कमी प्रीमियम वर घेऊ शकतात.

परंतु राज्यात अजूनही अनेक शेतकरी आहेत जे आर्थिक अडचणीमुळे सुपीक जमीन असूनही शेती करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजना सुरू केली आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना सर्व प्रकारची आर्थिक मदत मिळू शकते चार महिन्यांनी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते या योजनेपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने लाडका शेतकरी योजना सुरू केली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या

महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया येथे पहा.