एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती ( ICDS Bharti )
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती ( ICDS Bharti ) जाणून घ्या अर्ज प्रकिया
![]() |
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती |
ICDS Requirement: महिला व बाल विकास विभाग एकात्मिक विकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका गट-क संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील एकूण 102 रिक्त पदांच्या भरती करिता फक्त पात्र महिला उमेदवाराकडून विभागाच्या https://icds.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 14/10/2024 रोजी 11:00 वा. पासून ते दिनांक 3/11/2024 रात्री 23:55 वा. या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरती करता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ( Computer Based Test ) ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
प्रस्तुत परीक्षेमधून महाराष्ट्र राज्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्पांतर्गत सरळसेवेच्या कोट्यातील गट-क संवर्गातील मुख्यसेविका यांची 102 पदे भरण्यात येणार आहेत.
परिक्षा दिनांक: याबाबतची माहिती https://icds.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या ऑनलाईन प्रवेश पत्रकाद्वारे कळविण्यात येईल प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.
पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतूद:
पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल (कमी/वाढ) होण्याची शक्यता आहे.
पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा/ सूचना वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. परीक्षा स्थगिती करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व प्रवर्गनिहाय पद संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार मा. अध्यक्ष राज्यस्तरीय निवड समिती तथा मा. आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई व समन्वय समिती यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत.
विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), व भटक्या जमाती (ड) प्रवर्गातील आरक्षित असलेली पदे आंतर परिवर्तनीय असून आरक्षित पदांसाठी संबंधित प्रवर्गातील योग्य पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्यावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार, गुणवत्तेच्या आधारावर केला जाईल.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ( EWS ) उमेदवाराकरिता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. राआधी- 4019 प्रक्र. 31/16-अ/ दि. 12/02/2019 व दि. 31/05/2021 व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बिसीसी- 2024/प्रक्र. 75/ 16- क/ दिनांक 27 फेब्रुवारी 2024 अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र कागदपत्र अर्ज करते वेळी सादर करणे आवश्यक राहील. तथापि विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळेस सादर केला सदर उमेदवारास कुठल्या प्रवर्गातील नियम लागू राहील.
खेळाडू आरक्षण:
शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक राक्रीधो- 2002/ प्र.क्र.68/ क्रीयुसे-2/ दि. 1 जुलै 2016 तसेच शासन शुद्धीपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक राक्रीधो- 2002/प्र.क्र.68/ क्रीयुसे-2/ दि. 18/08/2016 शुद्धिपत्रक दिनांक 10 ऑक्टोबर 2017, शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण- 1716 प्र. क्र. 18/ क्रियुसे- 2 दिनांक 30/06/2022 आणि नंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेले आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षण संदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
दिव्यांग आरक्षण:
लक्षणीय दिव्यांगत्व असलेले उमेदवार व्यक्ती खालील सवलतीच्या दाव्यास पात्र असतील.
1) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र किंवा 40% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पदलक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असलेल्या नियमानुसार अनुज्ञेय आरक्षण व इतर सोयी सवलती.
2) दिव्यांगत्वांचे प्रमाणपत्र किंवा 40% होता त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पसंती दिव्यांग प्रकारासाठी सुलिश्चित केले असल्यास नियमानुसार अनुज्ञेय सवलती.
अनाथ आरक्षण:
अनाथ व्यक्तींचे आरक्षण शासन निर्णय महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ- 2022/ पत्र क्रमांक 122/कार्या-03/ दिनांक 6 एप्रिल 2023 व सम क्रमांकाचे शासन पूरक पत्र दिनांक १० मे २०२३ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.
अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन शासन सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवाराला मा. आयुक्त, महिला व बालविकास पुणे यांचे कडून अनाथ प्रमाणपत्र यांची पडताळणी करून नियुक्ती देण्यात येईल.
पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती (सर्व उमेदवारांसाठी) :
उपरोक्त मुख्य सेविका या पदांसाठी अर्ज केलेले केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अरहता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणारे उमेदवारांना ज्यासंदर्भातील सक्षम अधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र ( Caste Certificate) व जात वैधता प्रमाणपत्र ( Cast Validity Certificate) निवड अंकी सादर करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
उमेदवारांना परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी 01 तास 30 मिनिटे अगोदर उपस्थित रहावे.
नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास शासन निर्णय क्रमांक 21.102.005 नुसार लागू करण्यात आलेली नवीन परिभाषिक अंशदायी निवृत्ती वेतन योजना ( New Defined Contributory Pension Scheme ) लागू राहील. त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण ) नियम 1984 आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही. तथापी सदर नियमात भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील.
एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळेस परीक्षा घेण्याचे आयोजित आहे.
अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेला विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे कागदपत्रे तपासणी करतेवेळी तपासण्यात येतील. सदर प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती मूळ असते मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे कागदपत्रे तपासणीच्या वेळी उपलब्ध करून देणे उमेदवारांना बंधनकारक राहील. त्यामधील प्रमाणपत्रे खो, चुकीची व अपूर्ण आढळल्यास संबंधित उमेदवारच पात्र ठरविण्यात येईल.
पात्रता:
- भारतीय नागरिकत्व तसेच महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा: उमेदवाराचे वयाची गणना ऑनलाइन अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांक येईल.
- खुल्या प्रवर्गासाठी: 21 ते 38
- मागासवर्गीय उमेदवारासाठी: 21 ते 43
शैक्षणीक अर्हता व अनुभव:
- पदांचे नाव: मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
- शैक्षणिक अर्हता: कोणत्याही शाखेतील पदवीधर
- वेतन श्रेणी: रू. 35400/ - 112400/-
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षाही ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील प्रश्नपत्रिकातील प्रत्येक प्रश्नास 02 गुण ठेवण्यात आलेले आहेत.
आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र:
- अर्जातील नावाचा पुरावा (एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा
- सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
- प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- अधिवास प्रमाणपत्र
- लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- संगणक ज्ञान पुरावा
परिक्षा शुल्क:
खुला प्रवर्गासाठी - 1000/-
मागासवर्गीय प्रवर्गासाठी- 900/-
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा