Ration Card : ई-केवायसी करा अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द प्रशासनाने या तारखेपर्यंत दिली अंतिम मुदत
Ration Card : ई-केवायसी करा अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द प्रशासनाने या तारखेपर्यंत दिली अंतिम मुदत
''National Food Security Scheme: अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. ''
![]() |
Ration Card : ई-केवायसी |
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ( Ration Card ) ई-केवायसी चे बंधन घातले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ( National Food Security Scheme)-
गरीब गरजूंना रेशन धान्य पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई- केवायसीची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई- केवायसीतून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली आहे. ई- केवायसी ( E- kyc) न केलेल्यांचे रेशन धान्य, तसेच रेशन कार्ड 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ( Ration Card) ई- केवायसीचे बंधन घातले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीही अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई- के.वाय.सी. प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई- केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
जर शिधापत्रिकाधारकाने 31 ऑक्टोबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना रेशन धान्य मिळणार नाही. याशिवाय आशा शिधापत्रिका धारकांची नावे ही रेशन कार्ड मधून वगळली जाणारा असून, त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत. शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सीडींग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून, ई- केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थ्यांच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.
Ration Card News : महाराष्ट्र सहित संपूर्ण देशभरातील रेशन कार्ड धारकांसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर रेशन कार्ड हे शासनाच्या माध्यमातून जाहीर केले जाणारे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. शासनाकडून रेशन कार्ड धारकांना राष्ट्रभावात अन्नधान्य दिले जाते. कोरोना काळापासून तर रेशन कार्डधारकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. देशभरातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील नागरिकांना शासनाच्या निर्णयाचा फायदा होत आहे. अशातच मात्र रेशन कार्ड धारकांना केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करायच्या सूचना शासनाकडून देण्यात आले आहेत. जे नागरिक रेशन कार्ड साठीच्या केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द होईल आणि त्यांना रेशन मिळणार नाही असे सांगितले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्ड ची केवायसी करणे आता सोपे झाले असे. आता रेशन कार्डधारकांना कुठूनही केवायसी करता येणार आहे. शिधापत्रिका धारक देशात कुठे असतील तरी ते त्यांच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन ई- केवायसी करू शकणार आहेत.
आधी केवायसी करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या मूळ गावी जावे लागत होते पण आता ही नवीन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या शहरांमध्ये राहणारे कामगारांना ते जिथे काम करतात तिथूनच केवळ शी पूर्ण करता येणार आहे.
हे ही वाचा- "Adhaar Updation Center's | आधार कार्ड अपडेट करणे झाले सोपे आणि सुलभ; या ठिकाणीही मिळणार सुविधा"
ई- केवायसी सोबतच रेशन कार्डशी मोबाईल नंबर लिंक करण्याची सुविधा ही आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई- केवायसी करण्यासाठी 31 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर ही मुदत 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली.
आता ही मुदत आणखी एका महिन्यांनी वाढण्यात आलेली आहे म्हणजेच आता नागरिकांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत हे प्रक्रिया पूर्ण करता येईल अशी माहिती समोर येत आहे.
पारदर्शकतेचा उद्देश-
स्थलांतरीत कुटुंबांना देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे. ई-केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
लाभार्थी तेच आहेत हे कळावे, बनावट लाभार्थी असल्यास ते सापडावेत, यासाठी शिधापत्रिकांना केवायसी आवश्यक आहे. धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी जिल्ह्यात 31 ऑक्टोबर पर्यंत ही मोहीम राबवली जात आहे. शिधापत्रिकाधारकांना केवायसी करणे बंधनकारक आहे.
- वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा